Crop Damage : यंदा वऱ्हाडात १०० टक्क्यांवर पाऊस

रब्बी हंगाम आणि पिण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध
Crop Damage
Crop Damage Agrowon

अकोला ः यंदाच्या मोसमात पावसाने (Heavy Rainfall) सर्वत्र हजेरी लावली. सततच्या पावसाने पिकांचे नुकसानही (Crop Damage) झाले. हंगामाचा समारोप करताना परतीच्या पावसानेही सोयाबीन, कपाशीला जोरदार (Soybean, Cotton Crop Damage) फटला दिला. मात्र सर्वत्र जोरदार झालेल्या पावसामुळे वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीनही जिल्ह्यांत पावसाची १०० टक्क्यांवर नोंद पोचली. या पावसामुळे रब्बीची (Rabi Season) चिंता तर मिटलीच, शिवाय आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीही आता उपलब्धता झालेली आहे.

Crop Damage
Weed Crop : तणनियंत्रणासाठी सोपे अवजार, गवत तलवार

यंदा या विभागातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच होता. हंगाम सुरू झाल्यापासून दोन ते तीन वेळा खंड वगळता संततधार पाऊस कायम होता. परिणामी, पहिल्या टप्प्यात मूग, उडदाच्या पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर आता परतीच्या पावसाने सोयाबीन काढणीच्या वेळीच हजेरी दिल्याने मोठी अडचण झाली. शेतकऱ्यांनी सोंगणी केलेले सोयाबीन जागेवरच भिजले. शेंगामधून कोंब फुटले.

वेचणीला आलेला कापूसही ओला झाला. पहिल्या टप्प्‍यात लागलेल्या बोंड्या काळवंडल्या. यामुळे सोयाबीन व कापूस उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे याच पावसामुळे आता रब्बीसाठी जमिनीत पुरेशी ओल मिळाली आहे. प्रकल्पांमध्ये सर्वत्र पाणीसाठा असल्याने सिंचनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध झालेले आहे. सोबतच येत्या उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची टंचाईसुद्धा तितकी भेडसावणार नाही.

तीनही जिल्ह्यांत १०० टक्क्यांवर

या हंगामात आजपर्यंत झालेल्या पावसाचा विचार केल्यास सुमारे १०४ टक्के पाऊस पडला. यात सर्वाधिक तेल्हारा तालुक्यात १३१ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७३७ मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत ७६९ टक्के पाऊस प्रत्यक्षात झाला. बुलडाणा जिल्ह्यात याच पावसाची आजवर ११३.३ टक्के एवढी नोंद झालेली आहे. आजवर सरासरी ७०५ मिलिमीटर पाऊस होत असतो. प्रत्यक्षात ७९९ मिलिमीटर पाऊस झाला. जळगाव जामोद व मोताळा हे दोन तालुके वगळले तर उर्वरित ११ तालुक्यांमध्ये सरासरी १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com