पावसामुळे पिकांवर कीड, रोगांचा धोका

सोयाबीनचे प्रमुख उत्पादक राज्य असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काही भागांत संततधार पावसामुळे पीक खराब झाले आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

नागपूर ः सोयाबीनचे प्रमुख उत्पादक (Soybean Producer) राज्य असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काही भागांत संततधार पावसामुळे पीक खराब (Crop Damage Due To Rain) झाले आहे. सोबतच मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये यलो मोझॅकचाही (Yellow Mosaic) प्रादुर्भाव दिसू लागल्याने येत्या हंगामात कच्च्या मालाच्या उपलब्धतेबाबत सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांची (Soybean Processor) चिंता आतापासूनच वाढली आहे.

Crop Damage
Crop Damage: सर्वाधिक वसमत, कळमनुरी तालुक्यात पीक नुकसान

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २२ जुलैपर्यंत देशात १०८.३७ लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात याच कालावधीत ९८.९९ लाख हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली होते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुख्य सोयाबीन उत्पादक आहेत. परंतु संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले आहे. ७.८ लाख हेक्‍टरवरील पिकांना पावसाचा फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाने प्राथमिक सर्वेक्षणाअंती वर्तविला आहे.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे सात लाख हेक्टरवरील पिके नष्ट

महाराष्ट्रात ६९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये कापसाच्या एकूण ३६.३८ लाख हेक्‍टरपैकी ३६ टक्‍के तर सोयाबीनची ३८.१४ लाख हेक्‍टर नियोजित क्षेत्रापैकी ३६.३ टक्‍के पेरणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण १५१.३३ लाख हेक्‍टरपैकी १०५.०३ लाख हेक्‍टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे. महाराष्ट्रातील ३४ पैकी तब्बल २१ जिल्ह्यांत मॉन्सूनचा १०० टक्‍के पाऊस झाला आहे.

होशंगाबादमधून ‘येलो मोझॅक’च्या तक्रारी

मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात आतापासूनच सोयाबीनवर ‘यलो मोझॅक’चा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी आहेत. मध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र सोयाबीन चांगल्या स्थितीत आहे.

ऑगस्ट मॉन्सूनच्या स्थितीवर भवितव्य

राजस्थान, गुजरात तसेच तेलंगणा या राज्यांमध्ये देखील सोयाबीनची परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले जाते. ऑगस्ट महिन्यातील मॉन्सूनच्या स्थितीवर सोयाबीन हंगामाचे भवितव्य अवलंबू राहणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com