Crop Damage : अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी साडेतीन कोटी रुपये

दोन्ही मंडलांत तब्बल ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे साडेतीन कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे.
Wet Drought
Wet DroughtAgrowon

वडाळा, जि. सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी व सोलापूर मंडलांत ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने (Wet Drought) मोठे नुकसान (Crop Damage) केले. या दोन्ही मंडलांत तब्बल ७७ मिलिमीटर पावसाची (Heavy Rainfall)नोंद झाली होती.

Wet Drought
Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण

या नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे साडेतीन कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. या पावसामुळे उत्तर सोलापुरातील खरीप हंगामातील तूर, सोयाबीन, कांदा, मूग, उडीद मका आदी पिकांचे नुकसान झाले.

Wet Drought
Grape Crop Insurance: द्राक्ष विमा योजनेचा लाभ कसा घ्याल ?

त्यानंतर कृषी विभाग व महसूल विभागाकडून रीतसर पंचनामे करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात केवळ या दोन मंडलांतच मोठे नुकसान झाले. त्यानंतर पंचनामे होऊनही मदतीबाबत चालढकल केली जात होती. पण अखेरीस ही मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे.

Wet Drought
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी

प्रामुख्याने उत्तर सोलापुरातील या मंडलातील कसबे सोलापूर, केगाव, कोंडी, शिवाजी नगर, भोगाव, अकोलेकाटी, कारंबा, गुळवंची, तरटगांव, नरोटेवाडी, बाणेगाव, मार्डी, राळेरास, सेवालाल नगर, होनसळ

या गावांमधील २९७८ शेतकऱ्यांच्या २११२ हेक्टर क्षेत्रावरील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन कोटी ५३ लाख ५३ हजार ९८ रुपयांचे वाटप करण्यात आले.

ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटीची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. सप्टेंबरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी वरिष्ठांकडे केली आहे, तीही लवकरच मिळेल.

- जयवंत पाटील, तहसीलदार, उत्तर सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com