
Silk Cocoon Production : अंडीपुंज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोशाच्या उत्पादनामुळे (Cocoon Production) केवळ २५० अंडीपुंजच्या प्रत्येकी दोन बॅच मधून ३ लाख ७ हजार २४ रुपयाचे उत्पन्न रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या (Silk Farming )हाती पडले आहे.
अंडीपुंज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोशाच्या उत्पादनाच्या संधीमुळे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारते आहे. तू आणि ती मिळून करावयाच्या रेशीम उद्योगात (Silk Industry) रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांतील महिलांचीही भूमिका महत्त्वाची ठरते आहे.
केव्हीके औरंगाबाद-१ चे दत्तक गाव असलेल्या देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी सदाशिव गिते यांनी ‘पॅरेंटल बाय-व्होल्टाईन रेशीम हायब्रीड सीड कोष’ (एफसी १ ॲण्ड एफसी २) उत्पादन सलग दोन वेळा अतिशय उत्तम प्रकारे घेतले आहे.
गीते यांच्या पत्नी पार्वती गीते, भाऊ मदन गीते व भावजई शारदा गीते यांचीही भूमिका या कोश उत्पादनात महत्त्वाची ठरली आहे.
गीते कुटुंबाने पहिल्या बॅचला २५० अंडीपुंजला १६८ किलो कोष उत्पादन घेतले. या कोषाच्या ४ डिसेंबर २०२२ ला केलेल्या विक्रीतून १ लाख ५९ हजार ७८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यावेळी त्यांच्या कोषाला ९६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
तर दुसऱ्या बॅचला २५० अंडीपुंजला १३४ किलो कोष उत्पादन मिळाले. या कोषाच्या ३ फेब्रुवारी २०२३ ला केलेल्या विक्रीतून १ लाख ४७ हजार २४३ रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. या वेळी त्यांच्या कोषांना १ लाख १५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
गीते कुटुंबीय २०१९ पासून रेशीम कोष उत्पादन घेतात. पहिल्या वर्षी त्यांनी केवळ एका बॅचमध्ये ९५ हजारांचे, दुसऱ्या वर्षी सहा बॅचमधून पाच लाखांचे, तिसऱ्या वर्षी सात बॅचमधून सात लाखांचे तर चौथ्या वर्षी म्हणजे यंदा आजवर सहा बॅचमधून जवळपास सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदाच्या बॅचमध्ये दोन वेळा अंडीपुंजसाठी लागणाऱ्या कोषांचे उत्पादन घेतलेल्या बॅचचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.