खडकवासला साखळीत तीन टीएमसी पाणीसाठा

मॉन्सूनचे राज्यात आगमन होऊन जवळपास आठवडा लोटला आहे. परंतु अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने पुणे जिल्ह्यालाही जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे
Water Storage
Water StorageAgrowon

पुणे : मॉन्सूनचे (Monsoon) राज्यात आगमन होऊन जवळपास आठवडा लोटला आहे. परंतु अनेक ठिकाणी पावसाने (Rain) पाठ फिरवल्याने पुणे जिल्ह्यालाही जोरदार पावसाची (Heavy Rain) प्रतीक्षा लागली आहे. पुणे शहरासह उपनगराची तहान भागविणाऱ्या तसेच हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील शेतीला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला (Khadakvasala Dam), पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणात केवळ ११ टक्के (३ टीएमसी) पाणीसाठा (Water Stock) शिल्लक आहे.

वेगाने घटत जाणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होत जाणार आहे. तरीही शहराला दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. मागील वर्षी या दिवसांत पाऊस सुरू होऊन या वर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे २५.४८ टक्के (७.४३ टीएमसी) पाणीसाठा होता. खडकवासला धरण साखळीतील धरणांची एकूण २९.१५ टीएमसी शहरासह सिंचनासाठी पाणीपुरवठा हवेली आणि इंदापूर तालुक्यात सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो.

तीव्र उन्हाळा आणि मॉन्सून दाखल होऊन एक ते दोन आठवडे होऊनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला नसल्याने चिंता वाढली आहे. यंदा तीव्र उन्हाळा असल्यामुळे कालव्यातून हवेली, दौंड आणि इंदापूर येथील शेती सिंचनासाठी ११३४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापूर्वी धरणांतील एक टीएमसी पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

टेमघर धरण दुरुस्तीच्या कारणास्तव चार महिन्यांपासून कोरडेठाक पडले आहे. पानशेत आणि वरसगाव वरसगाव धरणांचे पाणलोट क्षेत्रही कोरडे पडले आहे. धरणात अनुक्रमे १.६१ टीएमसी (१५.१७ टक्के), १.६७ टीएमसी (१३.०४ (टक्के), तर खडकवासला धरणात ०.३५ टीएमसी (१७.८० (टक्के) पाणीसाठा आहे. दोन्ही धरणांतून खडकवासला धरणांत १००० क्युसेकने सध्या पाणी सोडण्यात येत आहे. असे असले तरीही पावसाने जर आणखी ओढ दिली तर पुण्यासह हवेली, दौंड व इंदापूरकरांना पाण्यासाठी वणवण करावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com