Weather Update : वादळी पावसाचा अंदाज

राज्यात पावसाला पोषक वातावरण असल्याने अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : राज्यात पावसाला पोषक वातावरण (Favorable Weather Condition For Rain) असल्याने अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी (Heavy Rainfall) लावली आहे. दिवसभर उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यानंतर (Heat) दुपारी वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी (Rainfall With Lightning) लावत आहे. आज (ता. ८) राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Crop Damage : ‘जणू आभाळ फाटलं, अतिवृष्टीने ना पिके वाचली ना शेती’

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आला असून, हा पट्टा जैसलमेर, कोटा, गुना, सिधी, अंबिकापूर, बालासोर ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, आज (ता. ८) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या चक्राकार वाऱ्यांपासून उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

विजांसह पावसाचा इशारा

(येलो अलर्ट) :

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com