Nagpur APMC Election : निकालांनंतर प्रस्थापितांवर आत्मचिंतनाची वेळ

विदर्भातील बाजार समित्यांचे निकाल आल्यानंतर सहकार क्षेत्रात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रुजली असल्याचे सिद्ध झाले आहे.
APMC Election Vidarbh
APMC Election VidarbhAgrowon

Nagpur Election Update : विदर्भातील बाजार समित्यांचे निकाल आल्यानंतर सहकार क्षेत्रात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रुजली असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणूक निकालांनी प्रस्थापितांना हादरे दिले असून त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आणली आहे.

विदर्भात पहिल्या टप्प्यात ३९ बाजार समित्यांसाठी निवडणूक झाल्या. त्यामध्ये दिगज्यांची प्रतिष्ठा आपणाला लागली होती. मात्र सहकार क्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच पक्षांची पाळेमुळे घट्ट रुजली असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.

विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून अमरावती बाजार समिती ओळखली जाते. तब्बल २१०० कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होते. त्यामुळे ही बाजार समिती ताब्यात असावी याकरिता खासदार-आमदार राणा दांपत्याने भाजपला सोबत घेत जोरदार मोर्चे बांधणी केली होती. परंतु सहकारातील राजकारणाची जाण नसल्याने त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

APMC Election Vidarbh
Ratnagiri APMC Election : रत्नागिरीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे ११ उमेदवार विजयी

इतकेच काय तर आमदार राणा यांचे बंधू सुनील राणा यांनाही या ठिकाणी पराभवाची चव चाखावी लागली. हनुमान चालीसाच्या आडून राजकारण करणाऱ्या राणा दांपत्यांना या माध्यमातून योग्य धडा मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी या पार्श्वभूमीवर दिली आहे.

अमरावती जिल्ह्यात 6 बाजार समित्यांकरिता निवडणूक झाली. यातील पाच बाजार समित्यांवर काँग्रेस तर एकावर अपक्षांनी बाजी मारली आहे. मोर्शी बाजार समितीच्या लढतीत राज्यसभा सदस्य खासदार अनिल बोंडे यांनाही मतदारांनी नाकारले.

APMC Election Vidarbh
Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांना धक्का

चंद्रपूर जिल्ह्यातही नऊ बाजार समितींकरता लढती झाल्या. त्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व मूल या चार बाजार समित्यांवर काँग्रेसने तर चिमूर व नागभीड बाजार समित्यांवर भाजपने निर्विवाद यश संपादन केले.

यात सिंदेवाही बाजार समिती काँग्रेसने भाजपकडून तर चिमूर बाजार समिती भाजपने पहिल्यांदाच काँग्रेस कडून हिरावून घेतली.

चंद्रपूर व राजुरा बाजार समितीत काँग्रेस आणि भाजपने युती करून दोन्ही ठिकाणी सत्तांतर घडवून आणले. भंडारा जिल्ह्यात दोन बाजार समित्यांकरता लढती झाल्या. यातील भंडारा बाजार समितीवर काँग्रेसने वर्चस्व कायम राखले तर लाखनी मध्ये राष्ट्रवादी युतीची सत्ता आली.

यवतमाळ जिल्ह्यात मनोहरराव नाईक यांनी मतदारांवरील आपली जादू कायम असल्याचे स्पष्ट केले. पुसद बाजार समितीत मनोहरराव नाईक यांनी आपली सत्ता कायम राखली

आहे.

APMC Election Vidarbh
APMC Election Kolhapur : कोल्हापूर बाजार समितीत सत्ताधारी गटाची बाजी

यवतमाळ जिल्ह्यात सात बाजार समित्यांकरिता लढती झाल्या. यातील चार बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले.

एक बाजार समिती राष्ट्रवादी तर एक भाजपच्या ताब्यात गेली आहे. वर्धा जिल्ह्यात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. या ठिकाणी चार बाजार समित्यांकरता लढती झाल्या होत्या.

यातील चारही बाजार समित्यांवर काँग्रेसने एक हाती सत्ता राखली. नागपूर जिल्ह्यात चार बाजार समित्यांकरीता निवडणूक झाली. त्यातील तीन वर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असून एक बाजार समिती अपक्षांच्या ताब्यात गेली आहे.

रामटेक बाजार समिती निवडणूक ही माजी मंत्री सुनील केदार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्याकरता त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार जयस्वाल यांच्या सोबत हात मिळवणी केली. परंतु त्यानंतरही त्यांना या ठिकाणी गड राखता आला नाही.

मंत्री संजय राठोड यांच्या पॅनेलचा पराभव...

शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात सहभागी झालेल्या व सद्यःस्थितीत अन्न औषधी प्रशासन मंत्री तसेच यवतमाळचे पालकमंत्री पद भूषविणाऱ्या संजय राठोड यांना मात्र मतदारांनी त्यांच्याच दिग्रस विधानसभा मतदारसंघात नाकारले.

दिग्रस बाजार समितीत संजय राठोड यांच्या पॅनेलचा पराभव झाला. शिवसेना ठाकरे गटात सहभागी झालेल्या माजी मंत्री संजय देशमुख यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com