Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रतेबाबत तूर्त कोणताही निर्णय नको: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

हे प्रकरण संवैधानिकदृष्ट्या महत्वाचे आहे त्यामुळे त्यावर तातडीने सुनावणी होऊ शकत नाही. उद्याही याबाबत सुनावणी होण्याची शक्यता नाही. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची (Constitution Bench) स्थापना करणे आवश्यक आहे.
Shinde & Thackeray
Shinde & ThackerayAgrowon

(वृत्तसंस्था)

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (ता. ११) दिले. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. या विषयाची सुनावणी घटनापीठामार्फत (Constitution Bench) होईल, त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Shinde & Thackeray
Maharashtra Political Crisis- विधान परिषदः विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना,राष्ट्र्वादी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच

न्यायालयाच्या या आदेशामुळे या अपात्र आमदारांना आणखी काही काळ दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण संवैधानिकदृष्ट्या महत्वाचे आहे त्यामुळे त्यावर तातडीने सुनावणी होऊ शकत नाही. उद्याही याबाबत सुनावणी होण्याची शक्यता नाही. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची स्थापना करणे आवश्यक आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय घेऊ नये, अशी सूचना न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना (Assembly Speaker) दिली.

दरम्यान, न्यायालयात दाखल याचिकांवर काय निर्णय होणार, यावर बरीच राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. न्यायालयाच्या निकालानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले तर सरकारच्या भवितव्याविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. दरम्यान, आजच्या दिवशी हे प्रकरण न्यायालयासमोर आले नाही. यावरुन शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) , देवदत्त कामत (Devdatt Kamat) यांनी न्यायालयासमोर नाराजी व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com