Agricultural Drone : भाडेतत्त्वावर आधारित ड्रोन केंद्र स्थापन करणार : कुलगुरू डॉ. मणी

अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था विद्यापीठात स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ आणि आई ओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला.
Agricultural Drone
Agricultural DroneAgrowon

परभणी ः कृषी क्षेत्रात काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर (Drone) वाढणार असून विविध पिकांत कीड-रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, शेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर (Drone Use) करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपयोग व्हावा यासाठी कृषी विद्यापीठामध्ये भाडेतत्त्वावरील ड्रोन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Vice Chancellor Dr. Indra Mani) यांनी बुधवारी (ता. २५) पत्रकार परिषेदत दिली.

परभणी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुजू होऊन सहा महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कामांची माहिती देताना डॉ. इंद्र मणी म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठाने देशभरातील विविध संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे विविध विषयातील संशोधनाला चालना मिळणार आहे.

बीजोत्पादन तसेच विविध पिकांची रोपट्याचे उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. अन्न प्रक्रिया आधारित कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे काम येत्या मार्च प्रयत्न पूर्ण होईल.

सरकारी महाविद्यालये कृषी शिक्षणाची गरज पूर्ण करू शकत नाहीत. खासगी महाविद्यालयांनी सेवा म्हणून काम करण्याची गरज आहे.

अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था विद्यापीठात स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ आणि आई ओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला.

करारामुळे पीकनिहाय ड्रोन वापराच्या संशोधनास चालना मिळणार असून ड्रोन आधारित शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी करणे, विविध प्रकाराचे फवारणी नोझल तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य गतीने आणि काटेकोरपणे फवारणी करणे याबाबत प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळणार आहे.

Agricultural Drone
Agricultural Drone : शेती फायदेशीर करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान

केवळ फवारणी पुरते ड्रोनचा वापर मर्यादित न राहता, भविष्यात रोग व कीडींचे सर्वेक्षण, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन आदीकरिता ही उपयोगात येणार आहे.

याकरिता अद्ययावत केंद्र विद्यापीठात राहणार आहे. लवकरच विद्यापीठाकडे पाच ड्रोन उपलब्ध होती.

कलमे तयार करण्यासाठी रोबोट उपलब्ध करून सर्वांना सोबत घेऊन कामकाज अधिकाधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे.

त्यातून परभणी कृषी विद्यापीठाचा जगभरात नावलौकीक होईल. यावेळी शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, नियंत्रक दीपाराणी देवतराज उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com