सीताफळ बागेचा पीकविमा भरण्याची आज अंतिम संधी

पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राज्यात २०२१ - २२, २०२२ - २३ व २०२३ - २४ या तीन वर्षांमध्ये मृग बहारासाठी सीताफळ फळ पिकाचा समावेश करण्यात आला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

औरंगाबाद : सीताफळाचा फळपीक विमा (Custard Apple Crop Insurance) उतरविण्याची आज (ता.३१) शेवटची मुदत आहे. त्यामुळे राज्यभरातील सीताफळ उत्पादकांना (Custard Apple Producer) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत आपल्या पिकाचा विमा उतरविण्याची यंदाची ही शेवटची संधी असणार आहे.

पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राज्यात २०२१ - २२, २०२२ - २३ व २०२३ - २४ या तीन वर्षांमध्ये मृग बहारासाठी सीताफळ फळ पिकाचा समावेश करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे सीताफळ पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, जोखमेपासून शेतकऱ्यांच्या संरक्षण करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा योजनेसाठी महसूल विभागाचा पुढाकार

राज्यातील पुणे, नगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जळगाव, नांदेड, औरंगाबाद, बुलडाणा, परभणी, जालना, लातूर, वाशीम व अमरावती अशा एकूण १४ जिल्ह्यांतील काही महसूल मंडलांत २०२१ पासून सीताफळासाठी पहिल्यांदा ही योजना लागू करण्यात आली आहे. जन सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र तथा राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा बँकेतही सीताफळाचा फळपीक विमा स्वीकारण्याची सोय आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

नगर, अमरावती, वाशीम, औरंगाबाद, परभणी, जालना, बुलडाणा, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद व सोलापूर या जिल्ह्यांसाठी विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा २७५० रुपये, बीड जिल्ह्यासाठी ३३०० रुपये, लातूरसाठी ४१२५ रुपये, तर पुणे जिल्ह्यासाठी ६३२५ रुपये आहे. नगर, अमरावती, वाशीम या जिल्हा समूहाची जबाबदारी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, लातूर या जिल्हा समूहाची जबाबदारी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे व उस्मानाबाद या जिल्हा समूहाची जबाबदारी भारतीय कृषी विमा कंपनी, तर सोलापूर या जिल्हा समूहाची जबाबदारी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीवर देण्यात आली आहे.

२६ मे २०२२ या पत्रकान्वये नवीन १२ महसूल मंडले समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये औरंगाबादमध्ये पाचोड बु. व विहामांडवा, जरंडी, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व उत्राण, पाचोरा तालुक्यातील पाचोरा, कुऱ्हाड खु. व वरखेडी, पारोळा तालुक्यातील तामसवाडी, पुणे जिल्ह्यातील उरळी देवाची, बुलढाण्यातील चांधई व लोणार महसूल मंडलांत सीताफळ उत्पादकांना विमा संरक्षण घेता येईल.

सीताफळाला फळपीक विम्याचे कवच मिळावे, या साठी सीताफळ महासंघाच्या मार्गदर्शनाखाली ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने प्रयत्न केले. त्यानंतर मागील वर्षापासून १४ जिल्ह्यांतील महसूल मंडलांतील सीताफळाला विम्याचे कवच मिळाले आहे. सीताफळ उत्पादकांनी विमा उतरवून बागा संरक्षित कराव्यात.
संजय मोरे पाटील, संस्थापक प्रमुख, ॲग्रोव्हिजन गटशेती संघ, जि. जालना.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com