Election : अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस

खेड तालुक्यात तीन उमेदवारांचे अर्ज वैध
Election
ElectionAgrowon

खेड : तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या (Election) अर्जाची सोमवारी (ता. ५) छाननी करण्यात आली. अर्ज माघारी घेण्याचा आज (ता. ७) शेवटचा दिवस असून, निवडणुकीच्या रिंगणातून कोण माघार घेणार, कोण निवडणूक लढणार, कोण बिनविरोध होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Election
Gram Panchayat Elections : अजूनही संधी गेलेली नाही

तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी येणिये खुर्दमधील एका सरपंचपदाच्या उमेदवाराचा, तर सदस्यपदासाठी येलवाडी ग्रामपंचायतीचे दोन आणि देवोशी ग्रामपंचायतीचा एक असे एकूण तीन अर्ज अवैध झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.

Election
Jalgaon Dairy Election : अखेर निवडणुकीचा आखाडा तापला

सरपंचपदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्र (अर्ज) छाननी सोमवारी (ता. ६) हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात झाली. यामध्ये सरपंचपदासाठी आलेल्या येणिये खुर्द येथील एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. सदस्य पदासाठी तालुक्यातील येलवाडीमध्ये तीन अपत्य असल्याच्या पुराव्यावरून दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.

खेड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत छाननीनंतर सरपंचपदासाठी १३० उमेदवारांचे १३० अर्ज, तर सदस्यपदासाठी ५९६ उमेदवारांचे ५९८ अर्ज वैध ठरले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com