POCRA : ‘पोकरा’तील अवजारे बँक, वाहन वितरण चौकशीचा फार्स

ज्यांनी वितरण केले, तेच करणार चौकशी
POCRA
POCRAAgrowon

अकोला ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project) शेतकरी गट, कंपन्यांना वितरित केलेल्या अवजारे बँक, मालवाहतूक वाहन घटकांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मात्र हा केवळ चौकशीचा फार्स तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहेत.

जिल्ह्यात पोकरा प्रकल्पातून वितरित झालेल्या अवजारे बँक, मालवाहतूक वाहन या घटकांच्या चौकशीची शिफारस गेल्या काळात चौकशीसाठी नेमलेल्या तोटावार समितीने केल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील विविध तक्रारींची चौकशी करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालकांनीच वाशीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व इतर तिघांची समिती गठित केली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल सहसंचालक कार्यालयास दिला आहे.

समितीला चौकशीच्यावेळी अवजारे बँक, वाहनवाटपात संशय आलेला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात एकाचवेळी चौकशी करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

POCRA
'पोकरा' द्वारे अवजारे बँक प्रकल्प

हा अहवाल सादर होऊन बरेच दिवस झालेले आहेत. मात्र त्यानंतर कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने प्रकाशित केले होते.

त्यानंतर जिल्ह्यातील यंत्रणांनी आता तालुका कृषी अधिकाऱ्यांना अवजारे बँक, मालवाहतूक वाहन घटकांची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले.

या चौकशीबाबत कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रश्‍न 

कार्यक्षेत्राबाहेरील अधिकाऱ्यांकडून चौकशी का नाही?
ज्यांच्या कार्यक्षेत्रात अशा अवजारे बँका, वाहने दिली गेली त्याच तालुक्यातील अधिकाऱ्यांऐवजी दुसऱ्या जिल्ह्यातील पथकाने चौकशी केली असती, तर तथ्ये बाहेर येण्याची अधिक शक्यता वाढली असती.

पण तसे झालेले नाही. या चौकशीबाबत दिलेल्या आदेशात अवजारे बँक, वाहन दिलेल्या गट, शेतकरी कंपनीकडील संबंधित घटकांची माहिती प्रपत्रात मागवण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com