Natural Farming : नैसर्गिक शेतीतून विषमुक्त अन्ननिर्मिती शक्यः डॉ. पाटील

नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत,’’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
Natural Farming
Natural FarmingAgrowon

नगर ः ‘‘नैसर्गिक शेतीतून (Natural Farming) शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न (Toxic Free Food) निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत,’’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

Natural Farming
Natural Farming : नैसर्गिक शेतीचे ‘सूरत मॉडेल’ देशासाठी आदर्श ठरेल ः मोदी

महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १७ कृषी विज्ञान केंद्रांची एक दिवसीय नैसर्गिक शेती ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. लाखन सिंग, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, कृषी परिषदेचे संचालक विस्तार डॉ. विठ्ठल शिर्के ऑनलाइन उपस्थित होते.

Natural Farming
Natural Farming : शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेतीची गरज

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘हरितक्रांतीमुळे भारतीय कृषी उत्पादनात अमुलाग्र क्रांती झाली आहे. सद्यःस्थितीत शेती क्षेत्रासमोर सुरक्षित अन्न निर्मितीचे महत्त्वाचे लक्ष आहे.’’ डॉ. सिंग म्हणाले, ‘‘महात्मा फुले कृषी विद्यापीठातंर्गत आयोजित नैसर्गिक शेती कार्यशाळेमुळे केव्हीकेद्वारे शेतकऱ्यांमध्ये या विषयावर जनजागृती करणे शक्य होईल.’’

संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी नैसर्गिक शेतीबरोबरच सेंद्रिय शेती, योगिक शेती, झिरो बजेट शेतीविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण १७ केव्हीकेंचे कार्यक्रम समन्वयक, विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक उपस्थित होते.

‘नैसर्गिक शेती’वर मार्गदर्शन

मनोज सोलंकी, मंडळ कृषी अधिकारी उमेश भदाने, सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे, कोल्हापूर केव्हीकेचे डॉ. रवींद्र सिंग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील डॉ. नामदेव म्हसकर आणि नंदुरबार केव्हीकेचे डॉ. राजेंद्र दहातोंडे यांनी ‘नैसर्गिक शेती’वर मार्गदर्शन केले. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गोकूळ वामन यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com