जीएसटी विरोधात इंदापूरला व्यापाऱ्यांचा मोर्चा

आत्तापर्यंत अन्नधान्यासह जीवनावश्यक खाद्यान्न वस्तू करमुक्त होत्या. यापूर्वी व्हॅटमध्येदेखील (VAT) या सर्व वस्तू करमुक्त (Tax free) होत्या. त्यामुळे जीएसटीमधूनही या वस्तू करमुक्त ठेवण्याचे ठरले होते.
GST
GSTAgrowon

इंदापूर, जि.पुणे ः केंद्र शासनाकडून अन्नधान्य व खाद्यान्नावर ५ टक्के वस्तू व सेवा कराला (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. त्यास इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानुरूप शनिवारी (ता.१६) रोजी इंदापूर शहर किराणा व आडते व्यापारी संघटनेने आपली वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून शहरातून निषेध मोर्चा काढला. यात इंदापूर शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आत्तापर्यंत अन्नधान्यासह जीवनावश्यक खाद्यान्न वस्तू करमुक्त होत्या. यापूर्वी व्हॅटमध्येदेखील या सर्व वस्तू करमुक्त होत्या. त्यामुळे जीएसटीमधूनही या वस्तू करमुक्त ठेवण्याचे ठरले होते. शासनाने सुरुवातीला फक्त नोंदणीकृत कंपनीमध्ये विक्री होणाऱ्या जीवनावश्यक खाद्यान्न वस्तूंवर जीएसटीची (GST)आकारणी केली होती.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर त्याचा बोजा पडणार नाही, असे सांगितले गेले होते. नवीन बदल करताना सदर कायद्यात ब्रॅन्डेड ऐवजी प्री-पॅक्ड, प्री-लेबल्ड असा शब्दांचा बदल करण्याचे प्रस्तावित आहे.

या बदलामुळे एकूणच सर्व वस्तू अन्नधान्य, डाळी कडधान्ये, आटा, गूळ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ इ. जीवनावश्यक वस्तूंना जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे याचा फटका व्यापाऱ्यांसह सर्वांनाच बसणार असल्याचं यावेळी व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला आहे.

GST
GST On Food: केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाचा पाच कोटी व्यवसायिकांना फटका

ग्राहकांनाही बसणार आर्थिक फटका

वस्तू व सेवा करामध्ये विनाकंपन्या असलेले उत्पादनेही घेण्यात आल्याने व त्यावर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.याचा फटका व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही बसणार असल्याने त्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com