Organic Farming : गोरेगाव येथे जैविक शेती मिशनअंतर्गत प्रशिक्षण शिबिर

शेतकऱ्यांनी आपसांतील मतभेद टाळून सहमतीने शेतकरी गट स्थापन करीत पिकविलेले विषमुक्त अन्न व इतर उत्पादने महानगरांमध्ये पाठवण्याची सोय झाली आहे.
Organic Farming Buldhana News
Organic Farming Buldhana NewsAgrowon

साखरखेर्डा, जि. बुलडाणा ः येथून जवळच असलेल्या मौजे गोरेगाव येथील शेतकरी राजेंद्र बाजड यांच्या शेतात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती (Organic Farming) मिशनअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय विशेष जैविक शेती प्रशिक्षण शिबिर (Training camp)घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड होते.

प्रकल्प व्यवस्थापक निखिल हुशंगाबादे, कुंवरसिंह मोहने, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तेलबिया शास्त्रज्ञ भारत फरकाडे, क्लस्टर मॅनेजर अभिजित वंजारे, जैविक शेतीचे अभियंता अली, पुरुषोत्तम भराड, शरद साबळे, मधुकर साखरे, रामेश्‍वर शिंगणे, अविनाश हरकळ, अरुण मेरत, विठ्ठल मेरत, राजेंद्र बाजड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी श्री. राठोड, श्री. मोहने, निखिल हुशंगाबादे, अभिजित वंजारे यांनी जैविक शेतीबाबत मार्गदर्शन केले

पशु प्रजनन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वंध्यत्व निवारण शिबीर
साखरखेर्डा परिसरातील १० गावात २२१ शेतकरी जैविक शेती मिशन सोबत जोडले आहेत. परिसरातूनच समृद्धी महामार्ग जात आहे. शेतकऱ्यांनी आपसांतील मतभेद टाळून सहमतीने शेतकरी गट स्थापन करीत पिकविलेले विषमुक्त अन्न व इतर उत्पादने महानगरांमध्ये पाठवण्याची सोय झाली आहे. अवघ्या सहा ते सात तासांत हा विषमुक्त शेतीमाल परदेशात देऊ शकतो. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा.
वसंतराव राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com