
अकोला : तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) (ATMA) व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मौजे माझोड येथील महादेव पुंडे यांच्या कांदा लागवड (Onion Cultivation) प्रक्षेत्रावर कांदा बीजोत्पादन (Seed Production) या विषयाबाबत दुसरा वर्ग घेण्यात आला.
या वेळी केव्हीकेचे शास्त्रज्ञ गजानन तुपकर यांनी बीजोत्पादन लागवडीसाठी कांदा निवड, कांद्याचा आकार, वजन कसे असावे, कांदा लागवडी वेळी का कापतात, लागवडी वेळी बीजप्रक्रिया कशी करावी,
कशासाठी करावी व कोणते कीटकनाशक, बुरशीनाशक वापरावे तसेच लागवड व खोली किती असावी, सुरुवातीचे पाणी व्यवस्थापन अशा विविध बाबींचे मार्गदर्शन केले. या वेळी सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोळ, माझोडचे सरपंच श्री. बोबडे, उपसरपंच श्री खंडारे, प्रगतिशील शेतकरी संतोष ताले, शरद वडतकार आणि गावातील बहुसंख्य कांदा बीजोत्पादक शेतकरी तसेच महिला शेतकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.