Soybean Food : सोयाबीनपासून प्रथिनेयुक्त पदार्थांचे महत्त्व यावर प्रशिक्षण

खरपूडी कृषी विज्ञान केंद्राद्वारे गृहविज्ञान विभागामार्फत कुपोषण निर्मूलनासाठी सोयाबीनपासून प्रथिने युक्त पदार्थ व त्याचे महत्त्व या विषयावर अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी प्रात्यक्षिकाद्वारे शुक्रवारी (ता. १६) प्रशिक्षण घेण्यात आले.
Soybean Food
Soybean FoodAgrowon

जालना : खरपूडी कृषी विज्ञान केंद्राद्वारे (Kharpudi KVK) गृहविज्ञान विभागामार्फत कुपोषण निर्मूलनासाठी (Malnutrition) सोयाबीनपासून (Soybean Food) प्रथिने युक्त पदार्थ व त्याचे महत्त्व या विषयावर अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी प्रात्यक्षिकाद्वारे शुक्रवारी (ता. १६) प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातून २७ पर्यवेक्षिकाणी हजेरी लावली.

Soybean Food
Cotton Soybean Rate : कापूस, सोयाबीनच्या दरांत नरमाई

या प्रशिक्षण कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सोनुने यांनी सोयाबीनचे क्षेत्र, उत्पन्न व त्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे याबद्दल माहिती सांगून प्रशिक्षणात पर्यवेक्षिकाणी पूर्णवेळ हजर राहून लाभ घ्यावा, असे सांगितले.

तांत्रिक सत्रात केविकेच्या गृहविज्ञान तज्ञ प्रा.एस. एन. कऱ्हाळे यांनी बालकातील कुपोषण व त्यावरील उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी सकाळ -ॲग्रोवनचे संतोष मुंढे यांनी सर्व पर्यवेक्षिकाचे कौतुक करून अंगणवाडी पर्यवेक्षिकांची भूमिका महिला व बालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी फार महत्त्वाची, असल्याचे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com