
बारामती : एकात्मिक फलोत्पादन (Horticulture) विकास अभियान, महाराष्ट्र राज्य औषधी व सुगंधी वनस्पती मंडळ आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र-कृषी विज्ञान केंद्र बारामती (KVK Baramati) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय फळे व भाजीपाला निर्यात (Fruit Vegetable Export) प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण बारामतीतील भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये घेण्यात आले.
९ ते ११ डिसेंबर या कालावधीत झालेल्या प्रशिक्षणासाठी नाशिक, हिंगोली, सोलापूर व लातूर विभागातून एकूण ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. फळे व भाजीपाला निर्यात परवाना, फळे व भाजीपाल्यांचे विषमुक्त उत्पादन, पॅकहाउस, कोल्ड स्टोअरेज तसेच विविध देशांमध्ये भाजीपाला निर्यात करताना त्या देशांच्या अटी व नियमावली अशा विविध विषयांवर या वेळी मार्गदर्शन केले. यशवंत जगदाळे, गोविंद हांडे, तुषार जाधव या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
हरितगृहामधील भाजीपाला व्यवस्थापन, भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन, फळे व भाजीपाला प्रक्रिया व भाजीपाला निर्यात या विषयांचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत.
तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये सेंद्रिय शेती, ॲग्री बिझनेस स्टार्ट-अप व ड्रॅगनफ्रूट शेती अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख व प्रशिक्षण समन्वयक यशवंत जगदाळे यांनी दिली. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.