Water Tanker Scam : टॅंकर घोटाळ्याचा तपास ‘ईडी’कडे द्या

Water Tanker Scam News : जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या काळात लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला. त्यात टँकर घोटाळा झाल्याची तक्रार झाल्यानंतर पाणीपुरवठा करणाऱ्या ‘साई सहारा अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ या खासगी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Water Tanker
Water TankerAgrowon

Nagar News : जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या काळात लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला. त्यात टँकर घोटाळा झाल्याची तक्रार झाल्यानंतर पाणीपुरवठा करणाऱ्या ‘साई सहारा अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ या खासगी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होऊन एक वर्षाचा कालावधी झाला तरी तपासात कुठलीही प्रगती नाही तपासाबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करत टँकर घोटाळ्याचा तपास सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) द्यावा, अशी मागणी मूळ तक्रारदार लोकजागृती सामाजिक संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

Water Tanker
Water Shortage : धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी; टंचाई वाढण्याची स्थिती

पारनेर तालुक्यातील लोकजागृती सामाजिक संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला बनावट जीपीएस बसून बोगस खेपा दाखवून गैरव्यवहार केला. सुमारे ७८ हजार खेपाच्या माध्यमातून शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचा आरोप करत लोकजागृती सामाजिक संस्थेने तक्रार दाखल केली.

Water Tanker
Water Shortage Marathwada : मराठवाड्यात तहानलेल्या गावांची संख्या ३८१ वर

बराच तपास आणि चौकशीनंतर पाणीपुरवठा करणाऱ्या पारनेरमधील साई सहारा अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी संस्थेवर एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे, तरीही तपासात मात्र कसली प्रगती नसल्याचे लोकजागृती संस्थेचे म्हणणे आहे.

टँकर घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या संस्थेतील लोक तपास यंत्रणेवर दबाव आणला जात असून, त्यामुळे तपास अधिकारीही हतबल आहेत. या लोकांनी टॅंकर घोटाळ्यातून मिळवलेल्या पैशातून कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता खरेदी केली आहे.

तपासाला उशीर केला तर ही मालमत्ता इतरांकडे हस्तांतर होण्याची शक्यता आहे. पोलिस यंत्रणा या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

योग्य पद्धतीने तपास होईना

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात शासकीय रकमेचा अपहार झालेला असून, योग्य पद्धतीने तपास होत नसल्यामुळे शासनाचा मोठा तोटा होत आहे. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय असल्यामुळे अधिकारीही या प्रकरणाचा तपास होण्याबाबत दखल घेत नाहीत.

त्यामुळे या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास होण्यासाठी हा तपास सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) द्यावा व व राज्य शासनाने तसे आदेश काढावेत, अशी मागणी संस्थेने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com