Zilla Parishad
Zilla ParishadAgrowon

Nashik ZP : जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांकडून झाडाझडती

पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमदार दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. ११) जिल्हा परिषदेची पहिली कामकाज आढावा बैठक घेतली.

नाशिक : पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमदार दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. ११) जिल्हा परिषदेची (Zilla Parishad) पहिली कामकाज आढावा बैठक घेतली. यात बांधकाम, लघुपाटबंधारे, समाजकल्याण, माध्यमिक विभागप्रमुख यांसह अनेक गटविकास अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांना परिपूर्ण माहिती सादर करता न आल्याने भुसे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. नियोजनातील आढावा घेताना असमान वाटपावर बोट ठेवत, कामे लवकर करत निधी खर्च करण्याच्या सूचना केल्या.

Zilla Parishad
Sugar Export: महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी गोड बातमी

आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, रवींद्र परदेशी उपस्थित होते. विभागनिहाय आढाव्यात प्राप्त निधी, नियोजन, निविदा, कार्यारंभ आदेश, सुरू व प्रलंबित कामे यांचा भुसे यांनी आढावा घेतला.

लघुपाटबंधारे विभागांतर्गत मंजूर असमान कामांवरून मालेगाव, कळवण तालुक्यांत साइड नव्हत्या का? डोळे बंद करून काम होतात का? असे कार्यकारी अभियंत्यास सुनावले. प्रसिद्ध न झालेल्या १७ निविदांवरूनही कार्यकारी अभियंत्यांची खरडपट्टी काढत, ढिलाई का झाली, स्थगिती तीन महिन्यांपूर्वी दिलेली आहे त्यापूर्वी निविदा का काढण्यात आल्या नाहीत, अशी विचारणा भुसे यांनी केली. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. याच विभागांतील स्थगिती दिलेल्या १७ कामांवरील स्थगिती उठविण्याचे आदेशदेखील दिले.

पालकमंत्री भुसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना बांधकाम विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश दिले. जनसुविधांतर्गत जागेची अडचण असताना कामे कशी मंजूर केली, असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित केला. पाणंद रस्त्यांची कामे मंजूर होऊन कामे सुरू न झाल्याने भुसे यांनी नाराजी व्यक्त केली.

Zilla Parishad
Farmer CIBIL : ‘सीबील’चा मुद्दा केंद्र सरकार तपासणार

समाजकल्याण विभागांतर्गत सायकलवाटप प्रस्तावावर पालकमंत्र्यांनी अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची शाळा घेतली. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यास विभागातील योजनेची माहितीच नसल्याचे निदर्शनास आले. ही प्राथमिक बैठक असल्याचे सांगत भुसे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महिनाभरात बैठक घेणार असल्याचे सांगितले.

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासााठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना भुसे यांनी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com