Jowar Cultivation : उन्हाळी हंगामात ज्वारी लागवडीकडे कल

सध्या गव्हापेक्षा ज्वारी खाण्याकडे शहरी नागरिकांचा कल वाढलेला आहे.
Jowar Cultivation
Jowar CultivationAgrowon

Buldana News : गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाकडे (Jowar Crop) पाठ फिरवली होती. मात्र आता पुन्हा खरीपाऐवजी रब्बी, उन्हाळी हंगामात (Summer Season) ज्वारी लागवडीकडे (Jowar Sowing) कल निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

या वर्षात रब्बीत सुमारे सव्वासहाशे हेक्टर, तर आता उन्हाळी हंगामात साडेतीनशे हेक्टरवर ज्वारीची लागवड झाल्याचे आशादायी चित्र आहे. कृषी विभागाने (Agricultural Department) केलेल्या जनजागृतीला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सध्या गव्हापेक्षा ज्वारी खाण्याकडे शहरी नागरिकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच गव्हाच्या तुलनेत बाजारात ज्वारी महाग विकत आहे. तसेच पशुधन पालन करणाऱ्यांना चाऱ्याची टंचाई भेडसावत आहे. चाऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट झालेला आहे.

Jowar Cultivation
Rabi Sowing : रब्बीच्या पेरणी क्षेत्रात ४१ हजार हेक्टरने वाढ

शिवाय वन्यजीवांनाही अतोनात त्रास व्हायचा. पूर्वी ज्वारीचे क्षेत्र अधिक राहत असल्याने चारा टंचाई भेडसावत नव्हती. आता पुन्हा शेतकरी चाऱ्याच्या उद्देशाने ज्वारीकडे वळू लागले. त्यामुळेच तालुक्यात रब्बीत सुमारे साडेसहाशे हेक्टरपर्यंत लागवड झाली होती.

ज्वारीचे क्षेत्र वाढले, तर त्याचे सामूहिक नियोजन करणे शक्य होते. आता उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांनी ज्वारी लागवडीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे साडेतीनशे हेक्टरपर्यंत पेरणी झाली. तालुक्यात सिंचनाच्या सोयीसुविधा गावोगावी असल्याने येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Jowar Cultivation
Rabi Jowar : औरंगाबाद तालुक्यात दोन हजार हेक्टरवर रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिके
शासनाने यंदा तृणधान्य वर्ष जाहीर केले आहे. आहारात ज्वारी, बाजरीचा वापर वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. तालुक्यात यंदा रब्बी हंगामात ६२४ हेक्टर आणि आता उन्हाळी हंगामात ३५० हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारी लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. ज्वारीला असलेली मागणी पाहता तसेच चाऱ्याच्या उद्देशाने ही लागवड वाढली आहे.
अमोल बनसोडे, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर, जि. बुलडाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com