Tribal Diwali Celebration : आदिवासी शेतमजुरांची दिवाळी ‘आनंदाची’

निफाड भागात हंगामी शेतीकामांसाठी मोठ्या प्रमाणावर आदिवासी शेतमजूर पेठ, सुरगाणा, सटाणा व लगतच्या गुजरात राज्य या भागांतून स्थलांतरित होत असतात; मात्र सणासुदीलाच कामांची लगबग असल्याने त्यांना सण साजरा करण्यास वेळ मिळत नाही.
Tribal Diwali Celebration
Tribal Diwali Celebration Agrowon

नाशिक : निफाड भागात हंगामी शेतीकामांसाठी मोठ्या प्रमाणावर आदिवासी शेतमजूर (Tribal Farm Labor) पेठ, सुरगाणा, सटाणा व लगतच्या गुजरात राज्य या भागांतून स्थलांतरित होत असतात; मात्र सणासुदीलाच कामांची लगबग असल्याने त्यांना सण साजरा करण्यास वेळ मिळत नाही. पोटापाण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच असतो. त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने भारतमाता आश्रमाच्या वतीने दरवर्षी ‘आनंदाची दिवाळी’ उपक्रम करण्यात येतो. या आदिवासी शेतमजूर महिलांना साडीचोळी, पुरुषांना पाच पोशाख वस्त्र व गोड फराळ (Diwali Faral) देऊन दिवाळी आनंदी करण्याची परंपरा कायम राखली आहे.

Tribal Diwali Celebration
Diwali Festival : अंतरीचा दिवा पेटवुया...

निफाड तालुक्यातील विंचूर, नांदूर मधमेश्वर, विष्णूनगर, बोकडदरे, शिवरे फाटा, लासलगाव या सहा ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला. शेतमजुरांची सकाळी भल्या पहाटे कामाची लगबग सुरू होते. त्यांचाही हा सण गोड व्हावा, यासाठी आश्रमाचे प्रमुख श्री. १०८ महंत स्वामी जनेश्वरानंदगिरी महाराज गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत.

सामाजिक बांधिलकी जोपासत या बांधवांच्या आयुष्यात आनंद पेरत आहेत. या वेळी शाम महाराज, सुदाम महाराज आंळदीकर यांनी दिवाळीचे महत्त्व सागितले. रामदास महाराज, शिवनाथ घुगे, कमलाकर गोडसे, क्रांती गोडसे, उत्तमराव सानप, अनिल सानप, प्रशांत बटवल, समाधान कापसे, प्रसाद जेऊघाले, कमलेश भावसार, अविनाश खैरनार आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेत उपक्रम साजरा केला.

पोटापाण्यासाठी घरदार सोडून कष्ट करताना साधा दिवाही त्यांच्या घरी पेटत नाही. त्यामुळे आनंदाचा क्षण त्यांच्याही आयुष्यात यावा यासाठी माणुसकीच्या भावनेने ही दिवाळी गोड करण्याचा छोटासा प्रयत्न केला.
जनेश्वरानंदगिरी महाराज, प्रमुख-भारतमाता आश्रम.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com