Rice : आदिवासींना मिळतोय भेसळयुक्त तांदूळ

आदिवासी कुटुंबांनी भेसळयुक्त तांदळाची मोजणी केल्यावर पन्नास किलोच्या गोणीमध्ये आठ किलोपर्यंत भेसळ असल्याचे निदर्शनास आले आहे.
Rice
RiceAgrowon

आनंद बोरा

Nashik Rice News : कोरोनाच्या काळापासून गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांना मोफत धान्य दिले जाते. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पेठ तालुक्यातील आदिवासींना योजनेतून मिळणाऱ्या तांदळात प्लॅस्टिकसारख्या दाण्यांची भेसळ आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने भेसळयुक्त तांदूळ खावा की नाही, असा प्रश्न आदिवासींपुढे आहे.

Rice
Tur, Wheat Rate : तूर, गहू आणि तांदूळ दर कमी करण्यासाठी सरकारची धडपड

आदिवासी कुटुंबांनी भेसळयुक्त तांदळाची मोजणी केल्यावर पन्नास किलोच्या गोणीमध्ये आठ किलोपर्यंत भेसळ असल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे, तर तांदळाच्या गोणीचे वजन तीन किलोने कमी मिळत असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे.

कमी तांदळामुळे नुकसान सहन करावे लागत असताना लाभार्थ्यांशी होणाऱ्या वादाला दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्‍वभूमीवर तांदूळ आदिवासी भागात पाठवला जातो, त्याठिकाणी तपासणी होते की नाही, हा प्रश्न आदिवासींमधून उपस्थित केला जात आहे. भेसळयुक्त तांदूळ शिजतही नसल्याचे आदिवासी कुटुंबांच्या ध्यानात आले आहे.

आमच्या पाड्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रेशनमधून भेसळयुक्त तांदूळ येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्तच्या योजनेतील तांदळातील भेसळीचे दुःख आहे. त्यामुळे तांदूळ पुरवला जातो त्याठिकाणी छापे टाकून तपासणी व्हायला हवी. तसे घडल्यास आदिवासींच्या आरोग्याच्या प्रश्न गंभीर होणार नाही.
रामदास भोये, फणसपाडा, ता. पेठ.
गेल्या दोन महिन्यांपासून आमच्या पाड्यावर भेसळयुक्त तांदूळ येत आहे. हा भेसळयुक्त तांदूळ शिजत नाही. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आम्हाला सतावू लागला आहे. आम्हाला दर्जेदार तांदूळ मिळावा, अशी आमची मागणी आहे.
सुगंधाबाई भोये, खरपडी पाडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com