Agrowon News : टीएसऑर्गो ऑर्गनिक्स कंपनीला ‘विदर्भ आयडॉल २०२२’ पुरस्कार

नागपूर येथील टीएसऑर्गो ऑर्गनिक्स प्रा. लि. या संस्थेला ‘विदर्भ आयडॉल २०२२’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. राज्याचे वने तथा सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 ‘विदर्भ आयडॉल  २०२२’ पुरस्कार
‘विदर्भ आयडॉल २०२२’ पुरस्कारAgrowon

नागपूर येथील टीएसऑर्गो ऑर्गनिक्स प्रा. लि. (TSORGO ORGANICS PVT. Ltd.) या संस्थेला ‘विदर्भ आयडॉल २०२२’(Vidharbha Idol Award 2022) पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. राज्याचे वने तथा सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळा ११ सप्टेंबर रोजी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) व शंकरबाबा पापळकर उपस्थित होते.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कमलेश झोडे, व्यवस्थापकीय संचालक सूर्यभान ठाकरे, विपणन संचालक राहुल पर्वतकर, विपणन संचालक प्रफुल्ल सोनटक्के यांनी पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी कृषी, कला, क्रीडा, शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, उद्योजक, पत्रकारिता, वारकरी संप्रदाय, या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विदर्भातील विविध संस्थांचा गौरव करण्यात आला.मागील वर्षी तत्कालिन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते टीएसऑर्गो ऑर्गनिक्स कंपनीला ‘अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.

टीएसऑर्गो कंपनीने ‘जैविक शेती-उत्तम शेती’ या ध्येयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून जैविक शेतीतून जास्त उत्पादकता मिळत नाही किंवा जैविक शेती परवडत नाही, हा भ्रम शेतकऱ्यांच्या मनातून दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com