Tur Crop Damage : जळकोट तालुक्यात तुरीचे पीक वाळले

तालुक्यात खरीपातील तुरीचे पीक मर रोगाने झाडे बुडापासूनच वाळल्याने मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने पाठवला आहे. तत्काळ पीकविमा मंजूर करण्याची मागणी होत आहे.
Tur Crop Damage
Tur Crop DamageAgrowon

जळकोट : तालुक्यात खरीपातील तुरीचे पीक (Kharif Tur Crop) मर रोगाने (Wilt Disease On Tur) झाडे बुडापासूनच वाळल्याने मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने (Agriculture Department) पाठवला आहे. तत्काळ पीकविमा मंजूर करण्याची मागणी होत आहे.

Tur Crop Damage
Tur Market : तूर उत्पादनात किती घट होणार ?

तालुक्यात बुरशीच्या प्रादुर्भावाने तुरीचा खराटा झाला असून हलक्या प्रतिच्या जमिनीवरील तुरीचे ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. तुरीचा खराटा झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांचा खर्चही निघणे अवघड झाले आहे.

Tur Crop Damage
Tur, Cotton Crop : अतिवृष्टीत तूर, कापूस पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करुन मदतीची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. साधारणतः चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तुरीचे पीक घेतले असल्याचे सांगण्यात आले. चेरा तसेच उमरगा रेतू येथील अमृत व्यंकटी केंद्रे, बालाजी कोंडीबा पन्हाळे, शुकुरमिया वाहिदमिया देशमुख, विश्वनाथ एकनाथ केंद्रे आदी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष पाहणी केली. धामणगाव व वांजरवाडा परिसरातही पाहणी केली.यावेळी सुधाकर सोनकांबळे , ओमकार टाले आदी उपस्थित होते.

तालुक्यात तुरीचे पीक

वाळत असल्याने शास्त्रज्ञांनी पहाणी केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून या पिकाच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागामार्फत वरिष्ठांना पाठवला आहे.

- आकाश पवार, तालुका कृषी अधिकारी, जळकोट

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com