
अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC Hingoli) धान्य बाजारात शुक्रवारी (ता. १७) तुरीची ३५० क्विंटल आवक होती. तुरीला (Tur Rate) प्रति क्विंटल किमान ७५०० ते कमाल ८५५० रुपये तर सरासरी ८०२५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
गुरुवारी (ता. १६) तुरीची २९५ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७८८५ ते कमाल ८५०० रुपये तर सरासरी ८१९२ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १५) २८५ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७४९९ ते कमाल ७९९५ रुपये तर सरासरी ७७४७ रुपये दर मिळाले.
मंगळवारी (ता. १४) ३०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७३३५ ते कमाल ७८०० रुपये तर सरासरी ७५६७ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १३) ३०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७२९० ते कमाल ७८८० रुपये तर सरासरी ७५८५ रुपये दर मिळाले.
शनिवारी (ता. ११) २९५ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७३५० ते कमाल ७८३० रुपये तर सरासरी ७५९० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १०) तुरीची ४०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ६९०० ते कमाल ७५५० रुपये तर सरासरी ७२२५ रुपये दर मिळाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.