Turmeric Harvesting : सांगली जिल्ह्यातील हळद काढणी सुरू

दोन दिवसांपूर्वी सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदे सुरू झाले असले, तरी नव्या हळदीची आवक पंधरा दिवसानंतर वाढेल, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Turmeric Harvesting : सांगली जिल्ह्यातील हळद काढणी सुरू

Turmeric Market News सांगली ः जिल्ह्यातील हळद काढणीस (Turmeric Harvesting) सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात काढणीचा वेग वाढणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदे (Turmeric Market) सुरू झाले असले, तरी नव्या हळदीची आवक (Turmeric Arrival) पंधरा दिवसानंतर वाढेल, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात १६०० हेक्‍टरवर हळदीची लागवड आहे. यंदाच्या हंगामातील हळद काढणीसाठी शेतकरी नियोजन करीत आहेत. जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, वाळवा तालुक्यातील हळद काढणी सुरुवात झाली आहे.

सध्या हळद काढण्यास गती नसली, तरी पुढील आठवड्यापासून हळद काढणीचा वेग वाढेल. बाजार समितीत गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. मात्र ही सौद्याच्या मुहूर्तासाठी शेतकऱ्यांनी विक्रीस आणली होती.

Turmeric Harvesting : सांगली जिल्ह्यातील हळद काढणी सुरू
Turmeric Processing : हळदीवर प्रक्रिया करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात महापूर आणि अतिवृष्टीचा फटका हळद पिकास बसल्याने हळदीच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे चित्र आहे. मात्र गेल्या वर्षी अतिवृष्टी, महापूर आला नाही. त्यामुळे शेतकरी हळद लागवडीकडे वळाले आहेत.

Turmeric Harvesting : सांगली जिल्ह्यातील हळद काढणी सुरू
Turmeric Rate : नांदेडमध्ये नव्या हळदीला ६२०० रुपये दर

त्यामुळे यंदा हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंत पोषक वातावरण राहिले आहे. त्यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. परिणामी, यंदा हळदीचे पीक चांगले बहरले आहे.

दरात तेजीचा अंदाज

सांगली बाजार समितीत यंदाच्या हंगामातील नव्या हळदीच्या सौद्यांना प्रारंभ झाला आहे. सध्या नव्या हळदीला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये इतका दर मिळत आहे. येत्या काळात दरात तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com