Kaneri Math Cow Death : कणेरी मठातील बारा गायींचा विषबाधेने मृत्यू

सिद्धगिरी मठ येथे सुमंगल पंचमहाभूत महोत्सव सुरू आहे. हजारो भाविक दररोज येथे भेट देत आहेत. त्यांच्यासाठी अन्नछत्राची उभारणीही करण्यात आली आहे. महोत्सव सुरू असताना गुरुवारी (ता.२३) रात्री काही गायींचा मृत्यू झाला.
Cow Death
Cow DeathAgrowon

Kaneri Marth Cow Death कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी मठ येथे सुरू असणाऱ्या सुमंगल पंच महाभूत लोकोत्सवाच्या (Panchmahabhut Lokotsav) दरम्यान मठाच्या गोशाळेतील बारा गायींचा मृत्यू (Cow Death) झाला. अन्नातील विषबाधेमुळे (Animal Poisoning) गायींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

गुरुवारी (ता.२३) सायंकाळपासून गायी अत्यवस्थ होण्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी (ता.२४) सकाळपर्यंत अनेक गायींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

१२ गाईंचा मृत्यू झाला. तर २२ जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी दिली. दरम्यान, प्रत्यक्षात गायींच्या मृत्यूचा आकडा ५० हुन अधिक असण्याची चर्चा होती. मठातील स्वयंसेवकांकडून माध्यम प्रतिनिधींवर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

Cow Death
Kaneri Math: कणेरी मठात भरले गाढवांचे प्रदर्शन

सिद्धगिरी मठ येथे सुमंगल पंचमहाभूत महोत्सव सुरू आहे. हजारो भाविक दररोज येथे भेट देत आहेत. त्यांच्यासाठी अन्नछत्राची उभारणीही करण्यात आली आहे. महोत्सव सुरू असताना गुरुवारी (ता.२३) रात्री काही गायींचा मृत्यू झाला. काही अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Cow Death
Organic Farming : कणेरीत पंचमहाभूत लोकोत्सवात १२६ पिकांचे सेंद्रिय शेतीचे प्रात्यक्षिक

अचानक गायींचा मृत्यू झाल्याने त्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. महोत्सवाला गालबोट लावण्याच्या उद्देशाने कोणी गायींना जाणीवपूर्वक विषबाधा केली आहे का, याची चाचणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती मठातील सूत्रांनी दिली.

कणेरी मठात घडलेली घटना हा एक दुर्दैवी अपघात आहे. कोणीतरी अज्ञानापोटी हे केले आहे. जाणीवपूर्वक कोणी करणार नाही. रस्त्यावरील गाई आणून त्यांचा सांभाळ करणारे आम्ही आहोत. त्यामुळे या गोष्टीचे सगळ्यात मोठे दुःख आम्हाला आहे.

- काडसिद्धेश्वर स्वामी, मठाधिपती, कणेरी मठ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com