नारायणगाव : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा ‘राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार’ (National Entrepreneur Award) नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या उद्योजिका श्वेता वायाळ, खोडद येथील युवा शेतकरी उद्योजक एकनाथ थोरात यांना गुरुवारी (ता.१२) देण्यात आला.
कृषी मंत्रालयाच्या केंद्रीय सचिव श्रीमती शुभा ठाकूर, मनेज (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट) हैदराबाद येथील महानिर्देशक डॉ. पी. चंद्रशेखर, नाबार्डच्या
महाव्यवस्थापक निवेदिता तिवारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक शंतनू पेंडसे, समुंन्नती फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार, कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते नवी दिल्ली पुसा येथील नास कॉम्प्लेक्समध्ये प्रदान करण्यात आला.
सन २०१८ ते २०२२ या दरम्यान ॲग्री-क्लिनिक्स आणि ॲग्री-बिझनेस सेंटर म्हणून ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्रातून यशस्वीरीत्या प्रशिक्षण घेतलेल्या मंचर येथील श्वेता वायाळ हिला
मधुमक्षिकापालन व्यवसायातील कार्यामुळे, तर खोडद येथील एकनाथ थोरात यांना पॉलीहाऊस मधील सातत्यपूर्ण योगदान आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन याकरिता महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कृषी उद्योजक २०१९ द्वितीय पुरस्कार सयुंक्तरीत्या प्रदान करण्यात आला.
नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात सन २०१६ पासून शेतकऱ्यांना उद्योजक घडविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आजपर्यंत ४११ प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले.
आजमितीस त्यापैकी २५० हून अधिक उत्तम व यशस्वी व्यावसायिक, उद्योजक बनले आहेत.
पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार विषयतज्ज्ञ राहुल घाडगे, प्रशिक्षण समन्वयक मीनल मेहेत्रे, युवा उद्योजक नितीन भुजबळ, डॉ. प्रशांत बेनके, प्रकाश बांगर, दत्तात्रेय येवले आदी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.