Manjra Dam : मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले

मांजरा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने रविवारी (ता. १६) सकाळी पावणेनऊ वाजता दोन दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले.
Manjra Dam
Manjra DamAgrowon

अंबाजोगाई, जि. बीड : मांजरा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने रविवारी (ता. १६) सकाळी पावणेनऊ वाजता दोन दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले. दरम्यान, यंदा उशिरा का होईना धरण भरल्याने सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार हे स्पष्ट आहे.

Manjra Dam
Crop Damage Compensation : पाणी साचलेल्या पिकांत शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

अंबाजोगाईसह लातूर, कळंब, केज या प्रमुख शहरांसह विविध खेड्यांची जिवन संजीवनी असलेले धनेगाव धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. त्याच बरोबर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनाचा प्रश्‍नही मिटण्याची आशा आहे.

रविवारी सकाळी या धरणाचे दोन दरवाजे उघडून मांजरा नदीत १७४७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला. तेवढीच आवक धरणात सुरू होती. उजव्या कालव्याचे दरवाजे उघडून त्यातही १४.९७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे सिंचन शाखेचे उपअभियंता श्री. नितनवरे व शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.

सलग तिसऱ्या वर्षीही भरले

मागील ४२ वर्षांत धनेगान धरण १६ वेळा भरले, तर मागील तीन वर्षांत सलग हे धरण प्रथमच भरले आहे. यंदाही धरण भरल्याने शेतकऱ्यांतही समाधान व्यक्त होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com