Natural Uranium : लिबियामधून अडीच टन नैसर्गिक युरेनियमची चोरी

लीबियातील सरकार समर्थक सशस्त्र गटांनी मात्र हा साठा सापडला असून तो सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.
Uranium
UraniumAgrowon

त्रिपोली (वृत्तसंस्था) : युद्धग्रस्त लीबियामधून (War Land Libya) अडीच टन नैसर्गिक युरेनियम (natural Uranium) गहाळ झाले असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या निरीक्षकांनी शुक्रवारी (ता. १७) जाहीर केले.

अण्वस्त्रे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या युरेनियमचा इतका मोठा साठा गहाळ झाल्याने संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे.

लीबियातील सरकार समर्थक सशस्त्र गटांनी मात्र हा साठा सापडला असून तो सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

अणु ऊर्जा संस्थेचे अध्यक्ष राफेल ग्रॉसी यांनी विविध देशांना लीबियातून गहाळ झालेल्या युरेनियमबाबत माहिती देत सावध राहण्यास सांगितले आहे.

Uranium
Agriculture Drone : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच ड्रोन विषयक अभ्यासक्रम

लीबियामध्ये युरेनियमचा साठा असलेल्या ठिकाणी नैसर्गिक स्वरूपात साठवून ठेवलेल्या युरेनियमचे दहा ड्रम बेपत्ता झाले आहेत. या ड्रममध्ये जवळपास अडीच टन युरेनियम आहे, असे निवेदन ग्रॉसी यांनी प्रसिद्ध केले आहे.

Uranium
Agriculture Processing Production : सिद्धाई ब्रॅंडची उत्पादने पोहोचली राज्यासह अमेरिकेपर्यंत

या निवेदनाशिवाय अणुऊर्जा संस्थेने इतर कोणतीही माहिती जाहीर केली नसून कोणत्याही प्रश्‍नांना उत्तर देणे टाळले आहे.

लीबियामधून अडीच टन युरेनियम गहाळ झाले असले तरी ते नैसर्गिक स्वरूपातील असल्याने त्याचा ऊर्जानिर्मिती किंवा बाँबनिर्मितीसाठी वापर शक्य नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.

युरेनियम समृद्धीकरण करण्यासाठी त्याचे रूपांतर आधी वायूमध्ये करणे आवश्‍यक आहे. नंतर अधिक प्रक्रिया करून वापरयोग्य स्वरूपात त्याचे रूपांतर केले जाते.

त्यामुळे सध्या धोका नसला तरी हा गहाळ झालेला साठा तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत असलेल्या हिंसक गटाच्या किंवा देशाच्या हाती लागल्यास ते यातून शस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकेल असे ५.६ किलो युरेनियम निर्माण करू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com