Honey Bee Attack : मधमाशांच्या हल्ल्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्रा अंतर्गतच्या गोविंदपूर परिसरातील सात बहिणींच्या डोंगरावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला.
Honey Bee
Honey BeeAgrowon

Chandrpur News तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्रा अंतर्गतच्या गोविंदपूर परिसरातील सात बहिणींच्या डोंगरावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केला.

यात नागपुरातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर वणी येथील चार जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. (Latest Agriculture News)

अशोक विभिषण मेंढे (वय ६३, रा. नागपूर), गुलाबराव पोचे (वय ५८, रा. नागपूर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. वणी येथील पार्थ सुदीप कोठारी (वय ६), सुदीप दिलीप कोठारी (वय ३०), दीपिका सुदीप कोठारी आणि मनोज राजूरकर हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Honey Bee
Honey bee : मधमाश्यांच्या वसाहती वाढवल्या पाहिजेत

नागभीड तालुक्यात निसर्गरम्य वातावरणात सातबहिणींचा डोंगर आहे. पहाडावरच देवीचे मंदिर आहे. बाराही महिने येथे पर्यटक दर्शन आणि फिरण्यासाठी येतात.

शनिवार (ता. ८) नागपूर आणि वणीचे काही पर्यटक दर्शनासाठी आले होते. अशोक मेंढे, गुलाब पोचे आणि कोठारी कुटुंबियांनी दुपारी देवीचे दर्शन घेतले.

त्यानंतर पहाडावरून खाली उतरत होते. दुपारी तीन वाजतादरम्यान मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात मेंढे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गुलाब पोचे यांच्यावर उपचासाठी नेताना वाटेत मृत्यू झाला.

तर जखमी पर्यटकांवर गोविंदपूर येथील डॉ. मदनकर यांच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे, तळोधीचे प्रभारी ठाणेदार आकाश साखरे, वनरक्षक सुशांत गौरकार उपस्थित होते.

Honey Bee
Honey Bee Keeping : मधमाशीपालन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

काही दिवसांसाठी पर्यटनावर बंदी

‘‘चार दिवसांपूर्वीच उमरेड येथील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यातही काहीजण जखमी झाले. या घटनेनंतर पुन्हा ही घटना घडली. या घटनेची चौकशी करण्यात येईल.

पर्यटकांच्या जीवाला कोणत्याही प्रकारची बाधा होता कामा नये, यासाठी वनविभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. तोपर्यंत सातबहिणीचा हा परिसर पर्यटनासाठी बंद राहील’’, अशी माहिती सहायक उपवनसंरक्षक के. आर. धोंडने यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com