चार वर्षांच्या संघर्षानंतर मिळाले दोन शिक्षक

दोन शिक्षक मिळाल्याने गावकरी व मुलांनी फटाके फोडून नवीन शिक्षकांचे अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले. या जल्लोषाने शिक्षकही भारावले. जिल्ह्यात शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत.
Z.P. School Maalpathar
Z.P. School MaalpatharAgrowon

यवतमाळ : पुसद तालुक्यातील (Pusad Village) माळपठार भागातील जिल्हा परिषदेच्या (Z.P. School Maalpathar) शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांनी केलेल्या आंदोलनाची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (Dr. Shrikrushna Panchal) यांनी घेऊन चार वर्षांनंतर दोन शिक्षकांची नियुक्ती केली. दोन शिक्षक मिळाल्याने गावकरी व मुलांनी फटाके फोडून नवीन शिक्षकांचे अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले.

Z.P. School Maalpathar
Crop Damage : शेतीमाल वाहतुकीची बैलगाडी गिरणा नदीत उलटली

या जल्लोषाने शिक्षकही भारावले. जिल्ह्यात शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. पुसद तालुक्यातील मारवाडी खुर्द गावच्या जिल्हा परिषद शाळेत २०१८मध्ये ५८ पटसंख्या असताना केवळ एकच शिक्षक कार्यरत होते. २०२२मध्ये ९२ पटसंख्या झाली तरी पंचायत समितीतून शिक्षक मिळाले नाहीत.

Z.P. School Maalpathar
Mango Crop Insurance : कोकणातील आंबा पिकासाठी विमा योजना

त्यातच कार्यरत शिक्षकाचीही आंतरजिल्हा बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून गावचे सरपंच बिंदू राठोड, उपसरपंच अरबाज हिराणी शेख, पोलिस पाटील वामन राठोड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शेख जब्बार शेख अहमद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख नदीम शेख रजाक,

Z.P. School Maalpathar
Crop Damage Survey : सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

माजी सरपंच शेख हिराणी शेख शमशू, विशाल आडे, गजानन शिंदे, संजय जाधव, अमोल राठोड, सुनील राठोड, योगेश आडे, शेख सिकंदर, राहुल कांबळे, राजू पाईकराव यांच्यासह पालक व विद्यार्थ्यांनी दीडशे किलोमीटरचा प्रवास करीत शिक्षकांच्या मागणीसाठी चक्क यवतमाळ येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कक्षात शाळा भरविली.

Z.P. School Maalpathar
Crop Damage Survey : सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

सीईओंच्या कक्षातच ठिय्या देऊन बसल्यावर प्रशासनाला जाग आली आणि तातडीने दोन शिक्षकांना रुजू होण्याचे आदेश दिले. दरम्यान, श्रावण चव्हाण व दीपक मोरे हे शिक्षक मारवाडी (खुर्द) गावात पोहोचताच विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या गळ्यात हार घालून, आतषबाजी करीत शिक्षकांना शाळेपर्यंत आणले.

‘रिक्त जागा त्वरित भरणे गरजेची’ गावकरी व विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा कित्ता गिरवून शिक्षकसंख्या कमी असलेल्या अनेक गावांचे पालक व विद्यार्थी शिक्षकांच्या मागणीसाठी पुढे येत असल्याने प्रशासनाने शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरणे गरजेचे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com