Veer Dam : ‘वीर’मधून दोन हजार २५२ क्युसेकने विसर्ग

नीरा खोरे धरणांच्या साखळीत असलेल्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक जूनपासून ५३३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे वीर धरण शंभर टक्के भरले आहे.
Veer Dam
Veer DamAgrowon

पुणे : नीरा खोरे धरणांच्या साखळीत (Neera Valley Dam Chain) असलेल्या वीर धरणाच्या पाणलोट (Veer Dam Catchment Area) क्षेत्रात एक जूनपासून ५३३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे वीर धरण शंभर टक्के भरले आहे. सध्या या धरणांतून दोन हजार २५२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला आहे. पावसाच्या येव्यानुसार या विसर्गात कमी-अधिक घट करण्यात येत आहे.

Veer Dam
Nashik Rain : जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

वीर धरणांची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ९.४१ टीएमसी एवढी आहे. सध्या या भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. त्यामुळे धरणात ०.१९ टीएमसी एवढी आवक सुरू आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत या धरणात एकूण ४२.४५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

रविवारी (ता. ११) सकाळी आठ वाजता या धरणांतून उजव्या कालव्याला ७०२ क्युसेकने, तर विद्युत गृहासाठी एक हजार ५५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. गेल्या वर्षीही याच काळात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २९७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यामुळे धरणात ७.०८ टीएमसी म्हणजेच ७५ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टमध्येच धरण शंभर टक्के भरले आहे. शेतकऱ्यांची आगामी काळातील पाण्याची चिंता मिटली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com