वादळी पावसाने दोन हजार हेक्टर पिकांचे नुकसान

जळगाव जिल्ह्यातील स्थिती; केळीला सर्वाधिक फटका
वादळी पावसाने दोन हजार हेक्टर पिकांचे नुकसान
Heavy RainAgrowon

जळगाव ः जिल्ह्यातील पाच तालुक्यात गुरुवारी (ता. ९) झालेल्या वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसामुळे (Pre-Monsoon Rain) दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Damage Crop) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान केळीचे (Banana) झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला (Agriculture Department) दिले आहेत.

जळगाव, चोपडा, धरणगाव, पाचोरा, भडगाव अशा पाच तालुक्यांत नुकसान झाले आहे. यात एकूण ४९ गावांतील १ हजार ३७६ शेतकरी बाधित झाले आहेत. केळीचे सर्वाधिक २ हजार ११ हेक्टर नुकसान झाले आहे. पपईचे पाच हेक्टर, तर लिंबाचे दहा हेक्टरवर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा येथे बुधवारी (ता. ८) मोठे नुकसान झाले होते. त्यात २४ गावांतील ५८४ शेतकरी बाधित होऊन ३९८ हेक्टरवर नुकसान झाले होते. आता पाच तालुक्यांत केळी पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांवर झाडे पडली आहेत.

कोठे किती नुकसान (हेक्टरमध्ये)

तालुका--केळी--पपई--लिंबू--एकूण

चोपडा--५१७--५--०--५२२.००

धरणगाव--१५--०--०--१५.००

जळगाव--१४२६--०--०--१४२६.००

पाचोरा--१८.८०--०-१०--२८.८०

भडगाव--३४.३३--०-०--३४.३३

एकूण--२०११.१३--५--१०--२०२६.१३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com