मराठमोळे उदय लळित सरन्यायाधीशपदी

मराठमोळे न्या. उदय उमेश ऊर्फ यू. यू. लळित यांनी शनिवारी (ता. २७) देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
Uday Lalit
Uday LalitAgrowon

नवी दिल्ली ः मराठमोळे न्या. उदय उमेश ऊर्फ यू. यू. लळित (Uday Lalit) यांनी शनिवारी (ता. २७) देशाचे ४९ वे सरन्यायाधीश (Chief Justice Of India) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी न्या. लळित यांना शपथ दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra Modi) आणि अनेक केंद्रीय मंत्री या वेळी उपस्थित होते. न्या. लळित यांचे पूर्वसुरी न्या. (निवृत्त) एन. व्ही. रमणा हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर न्या. लळित यांनी नव्वद वर्षांच्या वडिलांचे चरणस्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. सरन्यायाधीश म्हणून न्या. लळित यांना ७४ दिवसांचा कार्यकाळ मिळणार असून ते आठ नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील. त्यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार मराठमोळे न्या. धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) हे सरन्यायाधीश होतील.

Uday Lalit
Soybean : अमेरिका, भारतातील सोयाबीन हंगामाची स्थिती काय?

न्या. लळित यांचे कुटुंबच कायदा क्षेत्रामध्ये आहे. किमान १०० हून जास्त वर्षांपासून लळित कुटुंब वकिलीच्या व्यवसायात आहे. न्या. लळित यांचे आजोबा सोलापूर जिल्ह्यात कायद्याचा अभ्यास करत असत. त्यांचे वडील उमेश रंगनाथ लळित (वय ९९) यांचा वकिलीच्या क्षेत्रामध्ये दबदबा होता. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. त्यांच्या पत्नी अमिता लळित या शिक्षणतज्ज्ञ असून, त्या नोएडामध्ये शाळा चालवितात. न्या. लळित यांना हर्षद आणि श्रेयस ही दोन मुले आहेत. श्रेयस लळित यांनी आयआयटी गुवाहाटीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय सुरू केला. त्यांची पत्नी रवीनादेखील वकील आहे. तर हर्षद हे कायद्याच्या क्षेत्रात नाहीत. ते अमेरिकेत राहतात. सध्या तेही सपत्नीक भारतात आले आहेत.

Uday Lalit
Cotton : नव्या कापसाला १२ हजाराचा दर ?

खडतर परिश्रमांनी यश

न्या. लळित यांनी खडतर परिश्रमांनी कायदा क्षेत्रात यश मिळविले आहे. अगदी सुरुवातीला दिल्लीत आल्यावर ते पूर्वी दिल्लीच्या मयूर विहारमध्ये दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होते. पण त्यानंतर देशातील अग्रणी वकील म्हणून त्यांचे नाव झाले. अनेक हाय प्रोफाइल खटले त्यांनी हाताळले. टू जी गैरव्यवहार प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली, तेथेही त्यांनी आपला ठसा उमटविला.

या सुधारणांना प्रारंभ होणार

न्या. रमणा यांच्या निरोप समारंभात न्या. लळित यांनी काल तीन प्रमुख न्यायिक सुधारणांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, की खटल्यांच्या यादीमध्ये पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न असेल. मी अशी व्यवस्था करू शकतो, की ज्यामध्ये तातडीची प्रकरणे संबंधित खंडपीठांसमोर मुक्तपणे मांडता येतील. याशिवाय मी किमान एक घटनापीठ असे तयार करू इच्छितो ज्याचे काम वर्षभर चालले पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com