Maharashtra Crisis : लोकसभा सभापतींच्या विरोधात ठाकरे गट न्यायालयात

शिंदे गटाच्या प्रस्तावानुसार सभापती ओम बिर्ला यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना लोकसभेतील गटनेता म्हणून मान्यता दिली. तर भावना गवळी यांच्या मुख्य प्रतोद म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तीस मान्यता दिली.
Lok Sabha Speaker
Lok Sabha Speaker Agrowon

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटातर्फे लोकसभा सभापती (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पक्षाने केलेल्या नियुक्त्या रद्द करून शिंदे गटाने केलेल्या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. सभापतींची ही कृती एकांगी व घटनाबाह्य असल्याचे सांगत बिर्ला यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी ठाकरे गटातर्फे या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली.

Lok Sabha Speaker
Cabinet Decision: शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याचा निर्णय

दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटांनी यापूर्वीच परस्परांविरोधात काही याचिका यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. त्यात आणखी एका याचिकेची भर टाकत ठाकरे गटाने ही नवी याचिका दाखल केली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार व लोकसभेतील पूर्वाश्रमीचे नेते विनायक राऊत, मुख्य प्रतोद राजन विचारे यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाच्या प्रस्तावानुसार सभापती ओम बिर्ला यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना लोकसभेतील गटनेता म्हणून मान्यता दिली. तर भावना गवळी यांच्या मुख्य प्रतोद म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तीस मान्यता दिली.

Lok Sabha Speaker
Organic Farming: सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार

सभापती ओम बिर्ला यांनी केलेल्या या दोन्ही नियुक्त्या सामाजिक न्यायाचे (Social Justice) तत्व पायदळी तुडवणारे आहे. बिर्ला यांचा शिंदे गटाच्या दोन नियुक्त्यांना मान्यता देण्याचा निर्णय पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना बळ देत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com