Uddhav Thackeray : हा पोपटं मेलाय हे विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचंय ; उद्धव ठाकरेंनी सुनावले खडेबोल

SC Decision On Shiv Sena : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने निर्णय घेतला. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

Uddhav Thackeray Challenge Govt : बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपूत्रांच्या हक्कांसाठी शिवसेना जोपासली. ती गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला. यानिमित्ताने भाजपचा हिंदुत्त्वाच्या बुरख्याखाली दडलेला खरा चेहरा समोर आला आहे. कोर्टाने समोर ठेवलेला पोपटं हालत नाही, तो श्वासही घेत नाही. तो मेलेला आहे, हे फक्त विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचं आहे, बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. सगळे निवडणुकीला सामोरे जाऊयात. आपण हा फैसला जनतेवर सोपवुयात, जनता देईल तो कौल आपण स्वीकारू, असे आव्हान दिले.

Uddhav Thackeray
Supreme Court Decision on Shiv Sena : बहुमत चाचणी निर्णय चुकीचा ; राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्री या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी खासदार अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Supreme Court Hearing : नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे जाणार

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले. महाराष्ट्रात सुरु असलेल्या घटनांमुळे जगभरात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे जीवनदान तात्पुरते आहे. त्यामुळे या बेकायदेशीर सरकारने नैतिकतेला जागत राजीनामा दिला पाहिजे.

उद्धव ठाकरे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्यापरीने योग्य निर्णय घेतली. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप असा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर करण्याचा चांगला अनुभव आहे. कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी चौकट आखून दिली आहे. त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनाच निर्णय घ्यावाच लागेल. अध्यक्षांनी त्यांनी काही उलटसुलटं किंवा वेडवाकडं केलं तर आम्ही पुन्हा न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com