उद्धव ठाकरे आता करणार महाराष्ट्र दौरा

मुंबईबाहेरील पहिली सभा औरंगाबाद येथे होणार
Udhhav Thackeray
Udhhav ThackerayAgrowon

मुंबई : आजारपणातून बरे झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारच्या (ता.१४) मुंबईतील सभेनंतर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकरी आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांची मुंबईबाहेरील पहिली सभा औरंगाबाद येथे होणार आहे, अशी माहिती शिवसेना नेत्यांनी दिली.

‘‘मुख्यमंत्री ठाकरे गेल्या दोन वर्षांपासून घरातून कामकाज करत आहेत. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या व्यथा कशा कळणार, अशी टीका विरोधक करत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आजारपण यामुळे ठाकरे यांनी मंत्रालयातही येणे टाळले होते. आता ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत’’, अशी माहिती शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातून कामकाज केले. फेसबुक लाइव्ह करत नागरिकांशी संवाद साधत त्यांनी राज्यकारभार हाकण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर त्यांच्या पाठीच्या दुखण्यामुळे मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे दीर्घकाळ त्यांना विश्रांती घ्यावी लागली. जानेवारी महिन्यांत प्रथमच ते राजभवनातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत दरबार हॉलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांत दिसू लागले. मात्र डॉक्टरांनी सल्ला दिल्याने त्यांनी प्रवास टाळला. तसेच अजूनही त्यांना विमान अथवा हेलिकॉप्टर प्रवासास डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही. मात्र शनिवारी (ता. १४) बीकेसी मैदानावर झालेल्या शिवसंपर्क सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठाकरी शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

शनिवारच्या सभेनंतर शिवसेना जिल्हाप्रमुखांची सभा बोलविण्यात आली आहे. या आधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदार आणि आमदारांची बैठक घेऊन पक्षीय बांधणीचा आढावा घेतला आहे. यापुढील काळात तालुकापातळीवरील नेत्यांशी संवाद साधण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या दौऱ्यात शिवसैनिक आणि शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील. तसेच मुंबईबाहेरील पहिली सभा औरंगाबाद येथे होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com