Uddhav Thackeray : आता डंख मारायची वेळ आली

उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुभाष देसाई यांच्यासह आमदार आणि खासदारांसह प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

Mumbai News : धनुष्यबाण चोरला त्याला माहीत नाही की, त्यांनी मधमाश्‍यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. त्यांनी आजवर शिवसैनिकांनी (Shibsainik) जमवलेला मध चाखला आहे.

पण त्यांना अजून डंख बसलेला नाही. आता डंख मारायची वेळ आली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि भाजपचा (BJP) समाचार घेतला.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता. १८) सकाळपासून ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. कार्यकर्ते आक्रमक होऊन प्रचंड घोषणाबाजी करत होते.

उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुभाष देसाई यांच्यासह आमदार आणि खासदारांसह प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्याआधी उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोदरार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते. या वेळी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना, ‘तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. आमने सामने लढू’, असे आव्हान दिले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : सीमाभाग केंद्रशासित प्रदेश जाहीर करा ; उद्धव ठाकरे यांची मागणी

‘तुम्ही ज्या पद्धतीने धनुष्यबाण चोरला आहे ना, त्या चोरांना माझे आव्हान आहे. होऊ द्या निवडणुका,’ असेही ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी ओपन जीपवर उभे राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, की माझ्या हातात काहीच नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. आता शिवसैनिकांचे रक्त खवळले आहे. मी पुढचे आदेश देत जाईन. काल ज्यांच्या हातात धनुष्यबाण होता, त्यांचा चेहरा मी चोर आहे, असाच होता.

मी तुमच्यासोबत पहिल्यापासून होतो. पण आता खांद्याला खांदा देऊन राजकारणात लढूया. भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधानांना असे वाटत असेल की, गुलाम बनून असलेल्या यंत्रणा अंगावर सोडून शिवसेना संपवू, तर कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवू शकले नाही.

निवडणूक आयोगाने गुलामी केली. निवडणूक आयुक्त निवृत्त होऊन कुठले तरी राज्यपाल होतील. पण शिवसेना कुणाची हे तुम्ही ठरवू शकत नाही, तर महाराष्ट्राची जनता ठरवेल. त्यांना ठाकरे नाव हवे, बाळासाहेबांचे नाव हवे आहे. पण त्यांना शिवसेनेचे कुटुंब नको आहे.

कधी काळी मोदींचे मुखवटे घालून लोक सभेत येत होते. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावे लागत आहे. पण महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे, त्यांना मुखवटा आणि माणसे माहीत आहेत.

ज्या पद्धतीने शिवसेना हे नाव चोरांना दिले आहे, कपट कारस्थानाने हे राजकारण करत आहेत. चोरबाजार आणि त्यांच्या मालकाला धनुष्यबाण पेलता येणार नाही. मी खचलो नाही आणि खचणार नाही. शिवसैनिकांच्या ताकदीच्या जीवावर उभा आहे. ही ताकद उभी आहे तोवर मी अशा चोरांना गाडून शिवरायांचा भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही.

संपूर्ण कुटुंब रस्त्यावर

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय झाल्यानंतर एरवी आक्रमक होऊन भूमिका मांडणारे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांचे चेहरे पडले होते. वरळी येथे लागलेल्या आगीच्या घटनास्थळी गेलेले आदित्य ठाकरे हेही प्रचंड नाराज होते.

आजच्या बैठकीसाठी आलेल्या आमदार आणि खासदारांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता; मात्र, मातोश्रीबाहेर प्रचंड गर्दीमुळे एक वेगळेच वातावरण तयार झाले. गर्दीसमोर उभे राहून उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण केले.

त्या वेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेसज ठाकरे हे उन्हात उभे होते. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यासह अन्य नेतेही रस्त्यावर उभे होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com