
नेरळ ः रायगड, ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी (Ulhas River) बारमाही वाहत असल्याने लाखो कुटुंबांची जीवनदायिनी ठरली आहे. या नदीवर शेकडो पाणी योजना (water scheme) अवलंबून आहेत.
मात्र गेल्या काही दिवसांपासून नेरळ परिसरातील गृहप्रकल्पांकडून नदीतील पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. तर दुसरीकडे नदीची पातळी घटल्याने नेरळ, कर्जत शहरांत पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा-राजमाची परिसरातील तुंगार्ली येथून उल्हास नदीचा उगम होतो. धरणापासून ३ किमी अंतरावर नदीवर खंडाळा येथे कुणे धबधबा आहे.
पुढे ही नदी रायगड जिल्ह्यात कोंडिवडे, खांडपे, तमनाथ कर्जत, नेरळ, कोदिवले, दहीवली, बिरदोले, शेलू ही प्रमुख गावे व शहरांतून वाहत पाषाणे येथून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते.
नदीत टाटा विद्युत केंद्रासाठी वापरले जाणारे पाणी सोडले जाते. त्यामुळे ती बारही महिने वाहत असते. शेकडो पाणी योजना या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
धामोते-ममदापूर भागात अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत तर काहींचे बांधकाम सुरू आहे. यासाठी नदीच्या पाण्याचा वापर होतो.
गृहप्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही नदीत थेट जलवाहिनी टाकून पाणी उपसा केला जात आहे. अशा अनेक जलवाहिन्या व मोटार उल्हास नदीत टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.