Rajya Kisan Sabha : राज्य किसान सभेच्या अध्यक्षपदी उमेश देशमुख

सरचिटणीसपदी डॉ. अजित नवले यांची निवड
Rajy Kisan Sabha
Rajy Kisan SabhaAgrowon

नगर : महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या (Maharashtra Rajy Kisan Sabha) अध्यक्षपदी उमेश देशमुख यांची, तर सरचिटणीसपदी डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navle) यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी (ता. २) झालेल्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या अकोले येथील राज्य अधिवेशनात किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे (Dr. Ashok Dhawle) यांनी या निवडी जाहीर केल्या.

Rajy Kisan Sabha
Indian : स्वतः भारतीय म्हणून शाबूत राहू !

अकोला येथे झालेल्या राज्य किसान सभेच्या राज्य अधिवेशनाने ७ सदस्यांचे सल्लागार मंडळ आणि २३ जिल्ह्यांतील ७१ सदस्यांचे नवीन राज्य कौन्सिल एकमताने निवडले. राज्य अधिवेशनाने निवडलेले सल्लागार मंडळ आणि २९ सदस्यांचे राज्य पदाधिकारी मंडळ पुढीलप्रमाणे : राज्य अध्यक्ष उमेश देशमुख,

राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कार्याध्यक्ष : सुभाष चौधरी (नाशिक) व चंद्रकांत घोरखना (ठाणे-पालघर), उपाध्यक्ष : जे. पी. गावित, डॉ. उदय नारकर, किसन गुजर, सावळीराम पवार (नाशिक), सुनील मालुसरे (नाशिक), रडका कलांगडा (ठाणे-पालघर), अर्जुन आडे (नांदेड), यशवंत झाडे (वर्धा) सिद्धप्पा कलशेट्टी (सोलापूर), उद्धव पौळ (परभणी), माणिक अवघडे (सातारा), शामसिंग पाडवी (नंदुरबार).

सहसचिव : इरफान शेख (नाशिक), रमेश चौधरी (नाशिक), चंद्रकांत धांगडा (ठाणे-पालघर), चंद्रकांत वरठा (ठाणे-पालघर), विजय काटेला (ठाणे-पालघर) शंकर सिडाम (नांदेड), अजय बुरांडे (बीड) गोविंद आरदड (जालना), अनिल गायकवाड (बुलडाणा), महादेव गारपवार (अमरावती) अमोल वाघमारे (पुणे), सदाशिव साबळे (नगर).

कोशाध्यक्ष : संजय ठाकूर (रायगड), सल्लागार : एल. बी. धनगर (ठाणे-पालघर), लहानू कोम (ठाणे-पालघर) उदयन शर्मा (अमरावती), दादा रायपुरे (बुलडाणा), शंकरराव दानव (यवतमाळ), जयसिंग माळी (नंदुरबार), डॉ. आर. रामकुमार (मुंबई).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com