FAO :ग्रीन ॲग्रीकल्चर प्रोजेक्टसाठी डेझर्ट नॅशनल पार्कची निवड

या प्रकल्पासाठी देशातील पाच राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य निवडण्यात आले आहेत. राजस्थानमधील डेझर्ट नॅशनल पार्कचाही (DNP) समावेश या प्रकल्पात करण्यात आला.
Desert National Park
Desert National ParkAgrowon

संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनकडून (FAO) भारतात जैवविविधता व वनसंपदा संवर्धनासाठी ग्रीन ॲग्रीकल्चर प्रोजेक्ट (Green Agriculture Project) राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी देशातील पाच राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य निवडण्यात आले आहेत.
राजस्थानमधील डेझर्ट नॅशनल पार्कचाही (DNP) समावेश या प्रकल्पात करण्यात आला. डेझर्ट नॅशनल पार्क हे जैसलमेर आणि बारमेर या जिल्ह्यांत पसरले आहे.

ग्रीन ॲग्रीकल्चर प्रोजेक्ट अंतर्गत डेझर्ट नॅशनल पार्कच्या आतील आणि बाहेरील परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी ३१.४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
राजस्थानच्या मुख्य सचिव उषा शर्मा यांनी सोमवारी (१८ जुलै) घेतलेल्या बैठकीत या ग्रीन ॲग्रीकल्चर प्रोजेक्टच्या (Green Agriculture Project) कृती आराखड्याची सविस्तर माहिती करून घेतली.

त्यांनी जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रकल्प प्राधान्यक्रमाने राबवण्याचे आदेश दिले. याशिवाय हा प्रकल्प राबवण्यासाठी समन्वय साधण्याची सूचना केली.कृषी विभागाचे मुख्य सचिव दिनेश कुमार, जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टिना दाबी, बारमेरचे जिल्हाधिकारी लोक बंधू , डेझर्ट नॅशनल पार्कचे उपसंरक्षक आशिष व्यास आणि वन विभागाचे अधिकारी पी. बालमुरूगन, राजस्थानच्या कृषी विभागाचे उपसंचालक राधेशाम नरवाल हे अधिकारी या बैठकीस हजर होते.

Desert National Park
Paddy Stubble: पंजाबमध्ये 'या' शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी विभागाची (Agriculture Department) भूमिका निर्णायक असणार आहे. या प्रकल्पासाठी जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतीमधील १०,४०० शेतकरी कुटुंबाकडून जमीन विकत घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया समन्वयातून व कुठल्याही वादविवादाशिवाय पार पाडण्यात येणार असल्याचे दिनेश कुमार म्हणाले.

Desert National Park
Samyukt Kisan Morcha: कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र : योगेंद्र यादव

या प्रकल्पा अंतर्गत किसान पाठशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. स्थानिक शेतकरी कुटुंबामधूनच २०० प्राणीमित्र आणि पशुसखी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या परिसरातील स्थानिक शेतकरी कुटुंबातली सदस्यांना जंतनाशक आणि पशु लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक पर्यावरण संवर्धनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २०२६ अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार असल्याचेही दिनेश कुमार यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com