Soluble Fertilizer : अनधिकृत, विनापरवाना द्रवरूप खतांचा साठा जप्त

नाशिक विभागात काही खते विक्रेत्यांकडून अनधिकृत व विनापरवाना खतांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.
Micro Irrigation
Micro IrrigationAgrowon

Fertilizer Management नाशिक ः अधिकृत खत विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना अनधिकृत व विनापरवाना कमी दरात बनावट द्रवरूप खते (Fake Soluble Fertilizer) उपलब्ध करून विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर नाशिक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून छाप्यांचे सत्र सुरू आहे.

गोपनीय माहिती मिळाल्यानुसार धुळे जिल्ह्यातील बेहेड येथे सापळा रचून कृषी विभागाच्या पथकाने अनधिकृत व विनापरवाना खतांचा ६० लिटर साठा (Fertilizer Stock) जप्त केला असून त्याचे बाजारमूल्य १८ हजार रुपये आहे.

नाशिक विभागात काही खते विक्रेत्यांकडून अनधिकृत व विनापरवाना खतांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

त्यानुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून बेहेड (जि. धुळे) येथील धनदाई अॅग्रो एजन्सी या खत विक्रेत्याकडे सातपूर (नाशिक) येथील ‘ॲग्रो मित्रा न्युट्रीकेम’ या कंपनीने उत्पादित केलेल्या १९:१९:१९, ००:५२:३४, १२:६१, १३:४०१३, २४:२४:२४ अशा पाच लिटर कॅनमधील असलेल्या द्रवरूप खतांचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला.

Micro Irrigation
Soluble Fertilizers : विद्राव्य खते, संजीवकांची ओळख

विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शांताराम मालपुरे, नाशिक विभाग गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे, मोहीम अधिकारी प्रदीप निकम, पंचायत समिती कृषी अधिकारी अभय कोर, रमेश नेतनराव यांच्या सहकार्याने विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Micro Irrigation
Fertilizer Cost : खत आणि कीटकनाशकवरील खर्च नियंत्रित करावा लागेल

विक्रेता, उत्पादकाविरुद्ध पोलिसांत फिर्याद

बनावट द्रवरूप खते विक्रीप्रकणी संशयित धनदाई अॅग्रो एजन्सीचे मालक विनोद जयाजी तोरवणे व उत्पादक ॲग्रो मित्रा न्युट्रीकेम यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५,अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी साक्री येथे फिर्याद दाखल केली आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत उत्पादक कंपन्यांच्या कृषीनिविष्ठा खरेदी कराव्यात. कमी किमतीत मिळणाऱ्या दर्जाहीन कृषी निविष्ठा खरेदी करणे टाळावे. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे आढळून आले आहे.

कमी किमतीत निविष्ठा विक्री आढळून आल्यास गुणवत्तेबाबत शंका असल्यास कृषी विभागाला कळवावे. ‘क’ व ‘ड’ वर्गातील कृषी उत्पादक निविष्ठा उत्पादक यांच्यामध्ये तपासणी मोहीम सुरू आहे.

तीन वेळेस नमुना अप्रमाणित आल्यास विक्रेत्यांचे विक्री परवाने व संबंधित कंपन्यांचे उत्पादन व विक्री परवाने रद्द करण्याचे राज्य सरकारला कळवीत आहोत. गैरकाम करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

- मोहन वाघ, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक, कृषी विभाग.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com