Millet Year : पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व समजून घ्या

कार्यशाळेच्या निमित्ताने तृणधान्यापासून बनविलेल्या पाककृतींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
Millet
Millet Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : महिलांचे शेतीतील महत्त्व (Women Contribution In Agriculture) अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाकडील शेतीमध्ये महिलांना समान दर्जा हवा.

महिला शेतकऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचे (Millet Importance) महत्त्व समजून घेऊन त्याचा आपल्या कुटुंबाच्या आहारात उपयोग होण्याच्या दृष्टिने पीक लागवडीत (Millet Cultivation) नियोजन करण्याची गरज असल्याचे मत विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत (Vasantrao Naik Marathwada Agricultural University) छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात बुधवारी (ता. १) आयोजित ८४ व्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच व जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. जाधव बोलत होते.

Millet
Millet Year 2023 : पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सोलापुरात आज मिलेट दौड

कृषी विभागाच्या सहयोगातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. आर. देशमुख, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार तसेच कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, डॉ. अनिता जिंतूरकर, प्रा. अशोक निर्वळ, डॉ. संजूला भावर तसेच आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी पौष्टिक तृणधान्य काळाची गरज याविषयी सविस्तर माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र विशेषज्ञ प्रा. गीता यादव यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व मूल्यवर्धित पदार्थ याविषयी मांडणी केली.

कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर या विषयावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन डॉ. संजूला भावर यांनी केले.

Millet
Millet Year 2023 : पौष्टिक तृणधान्य विक्रीसाठी ‘जागर’ ब्रॅण्ड

तृणधान्ययुक्त पदार्थांनी वेधले लक्ष

कार्यशाळेच्या निमित्ताने तृणधान्यापासून बनविलेल्या पाककृतींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामधून उत्तेजनार्थ तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन महिला स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

नाचणी व खव्यापासून बनवलेले गुलाबजामून तसेच तृणधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांच्या ५६ भोग थाळीने सर्वांचे लक्ष वेधले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com