Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’, ‘टेंभू’च्या अपूर्ण कामांना मिळणार गती

ताकारी व म्हैसाळ योजनेचा ८ हजार २७२ कोटी ३६ लाख रुपये खर्चाचा पाचवा सुधारित प्रशासकीय अहवाल नुकताच डिसेंबर २०२२ मध्ये मंजूर झाला आहे.
Takari Water Scheme
Takari Water SchemeAgrowon

Agriculture Irrigation Scheme : कडेगाव, जि. सांगली ः जिल्ह्यातील दुष्काळी (Drought Affected Area) भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी व टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनांसाठी (Takari Tembhu Irrigation Scheme) राज्य सरकारने अर्थसंकल्पात एकंदरीत २१५ कोटींच्या निधीची तरतूद केल्यामुळे या योजनांच्या अपूर्ण कामांना गती मिळणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. विश्वजित कदम (Dr. Vishwajit Kadam) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

डॉ. कदम म्हणाले, की ताकारी, म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनांसाठी एकंदरीत ६०९ कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यापैकी टेंभू योजनेसाठी १५५, तर ‘ताकारी’साठी ६० कोटींचा निधी मिळणार आहे.

ताकारी व म्हैसाळ योजनेचा ८ हजार २७२ कोटी ३६ लाख रुपये खर्चाचा पाचवा सुधारित प्रशासकीय अहवाल नुकताच डिसेंबर २०२२ मध्ये मंजूर झाला आहे. यापैकी केवळ ताकारी योजनेसाठी १ हजार ३२२ कोटींची मंजुरी आहे.

Takari Water Scheme
Tembhu Irrigation Scheme : ‘टेंभू’बाधित जमिनींचा मिळणार मोबदला

ताकारी योजनेसाठी आजवर ९५० कोटी रुपये खर्च झाला. अजूनही ३७२ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी ६० कोटींच्या निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात झाली आहे. आता यापुढेही योजनेच्या पूर्णत्वासाठी आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करणार आहे. टेंभू योजनेला ४ हजार ८८ कोटींची प्रशासकीय मान्यता आहे.

Takari Water Scheme
Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’चे दुसरे आवर्तन १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

या योजनेसाठी ३ हजार २६६ कोटींचा खर्च झाला आहे. अजूनही ८२२ कोटींची गरज आहे. या योजनेसाठी १५५ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक निधीतील एक महत्त्वाचा टप्पा साध्य झाला.

आता विधानसभेत या योजनेला गती देण्याबाबत प्रश्‍न मांडून भरघोस निधी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे आमदार डॉ. कदम यांनी सांगितले. व योजना पूर्णत्वास आल्यानंतर ताकारीचे २७ हजार, तर ‘टेंभू’चे ८० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com