Union Budget 2023 : सर्वसमावेशक अर्थसंकल्प : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पायाभूत सुविधांना उभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वांना न्याय देणाऱ्या या अर्थसंकल्पात सहकाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
CM Eknath Shinde on Union Budget 2023 News Updates
CM Eknath Shinde on Union Budget 2023 News UpdatesAgrowon

CM Eknath Shinde News: पायाभूत सुविधांना उभारी देणारा हा अर्थसंकल्प (Budget) आहे. सर्वांना न्याय देणाऱ्या या अर्थसंकल्पात सहकाराला मोठा दिलासा मिळाला आहे.

साखर उद्योग (Sugar indutry) अडचणीत आला असताना त्यावरील प्राप्तिकर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी, शेतीत क्रांती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करून योजना प्रस्तावित आहेत.

आरोग्य, आदिवासी, शिक्षण, युवक कल्याण अशा क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.

CM Eknath Shinde on Union Budget 2023 News Updates
Union Budget 2023 : अर्थसंकल्पातून उद्योग, शिक्षणाला टेकू देण्याचा प्रयत्न

सप्तर्षी कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित घटकांना प्राधान्य, हरित विकास, युवक कल्याण, सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार अशी क्षेत्रे ठरविली आहेत. करप्रणालीत फेररचना केल्यामुळे सामान्य नागरिकांना फायदा मिळेल.

देशाची आर्थिक उन्नती साधणारा अर्थसंकल्प आहे. शहरविकासासाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com