Onion Rate : कांदा दरप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

राज्यात लेट खरीप कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडले असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Onion Rate
Onion Rate Agrowon

Onion Market Update गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) मोठी घसरण झाली आहे. दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेती पिकाचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी कांदा दराबाबत आढावा घेण्यासाठी तातडीची बैठकी बोलावली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे.

राज्यात लेट खरीप कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडले असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कांद्याचे दर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Onion Rate
Onion Procurement : नाफेड गुजरातमध्येही कांदा खरेदी करणार

कांदा दरासाठी ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तर ऐन होळीच्या सणादिवशी एका शेतकऱ्याने आपल्या दिड एकरावरील कांद्याची होळी पेटवली होती.

त्यामुळे दिवसेंदिवस कांदा दराचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यातच अवकाळी पावसाचाही फटका कांद्याला बसत आहे.

Onion Rate
Onion Bajarbhav : शेतकऱ्यांकडून लाल कांदा खरेदी करा

लेट खरीप कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. कांदा पडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायाला मिळत आहे.

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली. मात्र, कमी प्रमाणात होत असलेली खरेदी आणि उत्पादन खर्च्याच्या खाली मिळणाऱ्या दरामुळे नाफेडच्या खरेदीवर शेतकऱ्यांकडून टीका केली जात आहे.

दरम्यान, नाफेडकडून सुरू असलेली खरेदी ही दर पाडण्यासाठीच असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांनी रविवारी (ता.५) भारती पवार यांना घेराव घातला होता. यावेळी शेतकरी आणि पवार यांच्यामध्ये बाचाबाचीही झाल्याचे पाहायाला मिळाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com