केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री सोलापूरला येणार

वस्त्रोद्योगातील समस्या जाणून घेण्यासाठी दौरा
Piyush Goyal
Piyush GoyalAgrowon

सोलापूर ः सोलापूर वस्त्रोद्योग क्षेत्रात (Textile Industry) जगप्रसिद्ध आहे. सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या (Issue In Textile Industry) जाणून घेण्यासाठी तसेच सोलापुरातील टेक्स्टाइल व गारमेंट उद्योगास उभारी देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) येत्या ऑक्टोबर महिन्यात सोलापूर दौरा करणार असल्याची माहिती खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी (Dr. Jaysidhheshear Mahaswami) यांनी दिली.

Piyush Goyal
Cotton : अकोल्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

संसदीय अधिवेशन काळात संसदेत खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी भेट घेतली. या वेळी महेंद्र जैन, उद्योग व्यापार आघाडीचे श्रीनिवास दायमा उपस्थित होते. या भेटीवेळी डॉ.जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी सोलापुरातील हॅण्डलूम, पॉवरलूम, गारमेंट क्षेत्रातील चढ-उतार व कामगारांच्या समस्यांसंबंधी गोयल यांना सविस्तर माहिती दिली. तसेच सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले.

सोलापुरातील वस्त्रोद्योगास भेट, उद्योजकांच्या भेटी, त्यानंतर आयोजित मेळाव्यात सोलापुरातील उद्योजकांना केंद्र सरकारच्या धोरणांची, योजनांची माहितीपर मार्गदर्शन करणे, असे मंत्री गोयल यांच्या एकदिवसीय दौऱ्याचे स्वरूप असेल. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये हा दौरा होईल. याद्वारे सोलापूरच्या वस्त्रनिर्मिती क्षेत्रास उभारी मिळेल, असेही डॉ. महास्वामी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com