Pesticide : कीडनाशकांचा अशास्त्रीय वापर ठरतोय धोकादायक

पॅन इंडियाने केलेल्या अभ्यासानुसार कीडनाशकांच्या अशास्त्रीय वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती देखील विकसित होत आहे. केंद्र सरकारला दिलेल्या महितीनुसार कीडनाशक कंपन्यांकडून उत्पादनासोबत माहितीपत्रक दिले जाते.
Pesticide
Pesticide Agrowon

नागपूर ः कीडनाशकांचा अशास्त्रीय वापर (Unscientific Use Of Pesticide) व त्यांची हाताळणी मानवी व पर्यावरण आरोग्यासाठी (Human Health) धोकादायक आहे. क्लोरपायरिफॉस, फिप्रोनील, ॲट्राझीन व पॅराक्वाट डायक्लोराईड या चार कीडनाशकांचा (Pesticide Use India) भारतात असंमत पिकांमध्ये होणारा वापर अन्न सुरक्षिततेला (Food Security) धोका पोहोचवत असून पर्यावरण दूषितही (Environment) होत चालले असल्याचा अहवाल ‘पेस्टीसाईड ॲक्शन नेटवर्क’ (Pesticide Action Network) अर्थात पॅन इंडिया (Pan India) या संघटनेने उपलब्ध केला आहे. या संबंधीच्या धोरणांसंबंधीचे निर्णय शास्त्रीयदृष्ट्या आधारित हवेत. त्यांची कडक अंमलबजावणी हवी व आवश्‍यक शिक्षणही देण्याची गरज अहवालात नमूद करण्यात आली आहे.

केरळ राज्यातील थ्रिसूर येथे नुकतीच कीडनाशकांच्या वापराविषयी कार्यशाळा झाली. त्यावेळी केरळ कृषी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. पी. इंदिरा देवी यांनी या अनुषंगाने तयार झालेला अहवाल प्रसारित केला. पॅन (पेस्टीसाईड ॲक्शन नेटवर्क) अर्थात पॅन इंडिया या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल विकसित केला आहे. आंध्र प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा व पश्‍चिम बंगाल या राज्यात त्यासंदर्भात सर्व्हेक्षण करण्यात आले होते.

यामध्ये शेतकरी, मजूर व कीडनाशक वितरक अशा एकूण ३०० जणांशी संवाद साधून माहितीचे संकलन करण्यात आले आहे. क्लोरपायरिफॉस, फिप्रोनील, ॲट्राझीन व पॅराक्वाट डायक्लोराईड या चार कीडनाशकांचा वापर व नियामक पद्धती (रेग्यूलेशन) या विषयी या अहवालात भाष्य करण्यात आले आहे. कीडनाशकांचा अशास्त्रीय वापर व त्यांची हाताळणी पर्यावरण आरोग्यासाठी हिताची नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर यासंबंधीच्या धोरणांसंबंधीचे निर्णय शास्त्रीयदृष्ट्या आधारित हवेत. त्यांची कडक अंमलबजावणी हवी व त्यांचे शिक्षणही संबंधित व्यक्तींना द्यायला हवे असे अहवालात म्हटले आहे.

Pesticide
Pesticide Ban: केंद्राकडून 'त्या' २७ किटकनाशकांवर बंदीबाबत निर्णयाची शक्यता

कीडनाशकांची सुरक्षितता

पॅन इंडियाने केलेल्या अभ्यासानुसार कीडनाशकांच्या अशास्त्रीय वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती देखील विकसित होत आहे. केंद्र सरकारला दिलेल्या महितीनुसार कीडनाशक कंपन्यांकडून उत्पादनासोबत माहितीपत्रक दिले जाते. परंतु त्यावरील अक्षरांचा आकार कमी असतो. परिणामी धोकादायक कीडनाशके कशी हाताळावीत, शरीरावर विषाचा परिणाम झाल्यास उपाय काय अशा अनेक प्रकारच्या समस्या प्रभावीपणे लक्षात येत नाहीत.

शिफारसीविना आणि असुरक्षित वापरामुळेच चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फवारणी दरम्यान विषबाधेचे प्रकार घडले होते. त्यात शेकडो शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला. केरळ कृषी विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या पाहणीत १९ खाद्यपदार्थांमध्ये कमाल मर्यादा पातळीपेक्षा जास्त प्रमाणात क्‍लोरपायरीफॉस आढळून आले होते.

Pesticide
Pesticide : कीडनाशकांच्या वापरासंदर्भात जागरूकता आवश्यक

नियंत्रणासाठी हवी स्वतंत्र यंत्रणा

पॅन इंडियाच्या अभ्यासात सुमारे २० टक्‍के शेतकरी आणि ४४ टक्‍के शेतमजुरांनी सहभाग नोंदविला होता. अनेकांना अतिजहाल कीडनाशकांच्या हाताळणी संदर्भात शास्त्रीय माहिती नसल्याचे त्यातून पुढे आले आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी शिफारशीविना म्हणजे केवळ कृषी सेवा केंद्र चालकाच्या सल्ल्यावरून कीडनाशक फवारल्याची माहिती दिली. यातूनच फवारणी दरम्यान विषबाधेची आणि पर्यावरणीय दुष्परिणामांची जोखीम वाढते. त्यावर नियंत्रणासाठी स्थानिक प्राधिकरणाच्या माध्यमातून नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरजही अहवालातून मांडण्यात आली आहे.

संमती नसलेल्या पिकांत वापर

अहवालात पुढे म्हटले आहे की, संबंधित चार कीडनाशकांचा वापर हा विशिष्ट पिकांमध्ये व किडींमध्ये संमत करण्यात आला आहे. मात्र संमत नसलेली खाद्यपिके व अखाद्य पिकांमध्ये त्यांचा होणारा वापर हा अभ्यासाचा विषय आहे. भारतात क्लोरपायरिफॉस कीटकनाशकाचा वापर हा १८ पिकांत संमत आहे. मात्र त्याचा वापर २३ पिकांमध्ये आढळला आहे. फिप्रोनील कीटकनाशकाचा वापर नऊ पिकांत संमत आहे. तथापि २७ पिकांमध्ये त्याचा वापर होत असल्याची नोंद आहे.

त्याचबरोबर ॲट्राझीन व पॅराक्वाट डायक्लोराईड या तणनाशकांचा वापर अनुक्रमे एका व ११ पिकांत संमत आहे. मात्र प्रत्यक्षात अनुक्रमे १९ व २३ पिकांत तो होत असल्याचे आढळले आहे. अशा वापरामुळे शेतीमालाच्या असुरक्षिततेचा प्रश्‍न तयार झाला असून पर्यावरणही दूषित होत आहे. ज्या कीडनाशकांचा वापर संमत आहे. अशा ठिकाणी कमाल अवशेष मर्यादांवर (एमआरलएल) देखरेख ठेवता येते. मात्र कीडनाशकांचा वापर असंमत झाल्यास त्याठिकाणी समस्या तयार होतात. केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापारात अर्थात निर्यातीतही या समस्येमुळे धोके तयार होऊ शकतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com